पोखरी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन

जनसेवेच्या माध्यमातून आरोग्यसेवा : दीपक लंके
दत्ता ठुबे
पारनेर/प्रतिनिधी :
पोखरी, वारणवाडी, म्हसोबा झाप या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज राहतो या समाजाला व सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना आरोग्य सेवा गावात मिळावी व या सेवेच्या माध्यमातून जनसेवा व्हावी हा उदात्त हेतू समोर ठेवून सरपंच प्रकाश गाजरे यांनी पोखरी सारख्या भागात मोफत आरोग्य तपासणी शिबिर ठेवून चांगले काम केले आहे असे मत राष्ट्रवादीचे नेते दीपक लंके यांनी व्यक्त केले.
पारनेर तालुक्यातील पोखरी येथे निलेश लंके प्रतिष्ठान आणि म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे यांच्या संकल्पनेतून रविवार, १० ऑगस्ट २०२५ रोजी एच व्ही देसाई हॉस्पिटल, पुणे आणि मिलेनियम फाउंडेशन यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते दीपक लंके आणि सरपंच प्रकाश गाजरे यांच्या हस्ते झाले. टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटात राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमाची सुरुवात पोखरी येथून झाली.
या शिबिरात मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, माफक दरात चष्म्यांचे वाटप आणि जपानी तंत्रज्ञानाद्वारे संपूर्ण शरीराची तपासणी सुविधा उपलब्ध होती. शिबिराला ३०० हून अधिक रुग्णांनी सहभाग घेत लाभ घेतला. ग्रामस्थांच्या आरोग्याच्या काळजीसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरला.
यावेळी ज्येष्ठ नेते शशिकांत आंधळे, मोहन रोकडे, सामाजिक कार्यकर्ते सतीश पवार, नामदेव करंजेकर, सरपंच संजय काशीद, पांडुरंग आहेर, साहेबराव करंजेकर, संदीप गुंजाळ, भाऊ चौधरी, बाळासाहेब शिंदे, गणेश वाकळे, विलास आहेर, पांडुरंग भालके, लहू वाळुंज, अनिल आहेर, मुन्ना सय्यद, बन्सी काशिद, भाऊसाहेब कोकाटे, विकास काशिद, सुदाम काशिद, नानाभाऊ काशिद, महेंद्र काशिद, भास्कर कोकाटे, स्वप्नील काशिद, संतोष गाढवे, रामदास पवार (उपसरपंच, पोखरी), अशोक आहेर, कुंडलिक पवार, आदिनाथ वाळुंज, संजय करंजेकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि पोखरी ग्रामस्थ उपस्थित होते.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामस्थांनी निलेश लंके प्रतिष्ठान, सरपंच प्रकाश गाजरे आणि सहभागी संस्थांचे आभार मानले. हा उपक्रम गावातील आरोग्य सेवांच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि यापुढेही असेच उपक्रम राबवले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.



