इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि.१३/०८/२०२५

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण २२ शके १९४७
दिनांक :- १३/०८/२०२५,
वार :- सौम्यवासरे(बुधवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१२,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:५७,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर वर्षाऋतु
मास :- श्रावण
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- चतुर्थी समाप्ति ०६:३७, पंचमी २८:२४
नक्षत्र :- उत्तराभाद्रपदा समाप्ति १०:३३,
योग :- धृति समाप्ति १६:०५,
करण :- कौलव समाप्ति १७:३१,
चंद्र राशि :- मीन,
रविराशि – नक्षत्र :- कर्क – आश्लेषा,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- मिथुन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- क्षयतिथी वर्ज्य दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी १२:३४ ते ०२:०९ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०६:१२ ते ०७:४७ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०७:४७ ते ०९:२३ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी १०:५८ ते १२:३४ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०५:२१ ते ०६:५६ पर्यंत,

❀ दिन विशेष:
घबाड ०६:३७ प.,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण २२ शके १९४७
दिनांक = १३/०८/२०२५
वार = सौम्यवासरे(बुधवार)

मेष
मानसिक दडपण कमी होईल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. काही तडजोडी कराव्या लागतील. भौतिक सुखाला फार महत्त्व राहणार नाही. मान-सन्मानात वाढ होईल.

वृषभ
जुनी कामे पूर्ण कराल. कौटुंबिक खर्चाला आवर घालावी लागेल. मानसिक स्थैर्य लाभेल. बदलाच्या योजना अनुकूल ठरतील. कौटुंबिक गैरसमज मनातून काढून टाकावेत.

मिथुन
समोरील प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल. योजनाबद्ध कामे करावीत. घरातील प्रलंबित कामे उरकाल. मनाचा गोंधळ उडवून घेऊ नका. वरिष्ठांच्या होकारत होकार मिसळावा लागेल.

कर्क
जवळच्या व्यक्ति भेटतील. जवळच फेरफटका मारायला जाता येईल. जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे. भावंडांकडून चांगल्या बातम्या मिळतील. सहकारी तुम्हाला चांगली मदत करतील.

सिंह
मनातील वाईट गोष्टींचा निचरा करा. सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. सामाजिक प्रतिष्ठा जपावी. आवडी बाबत दक्ष राहाल. धाडस व पराक्रमात वाढ होईल.

कन्या
इतर कोणाकडून मदतीची फार अपेक्षा करू नका. मानसिक अवस्था संतुलित ठेवा. आवडत्या कामांमध्ये वेळ घालवा. मानापमानाच्या प्रसंगांकडे दुर्लक्ष करावे. कले संदर्भात नवीन वाट चोखाळाल.

तूळ
पूर्वी केलेली बचत मोलाची ठरेल. अधिकारी वर्ग तुमच्यावर खुश राहील. विशाल दृष्टीकोन बाळगावा. मित्रांशी सलोख्याने वागावे. मनाची चंचलता जाणवेल.

वृश्चिक
प्रतिष्ठित लोकांशी ओळख वाढेल. कामाला नवीन चालना मिळेल. अति उत्साह दाखवायला जाऊ नका. मानसिक शांतता लाभेल. आर्थिक आघाडीवर दिवस चांगला जाईल.

धनू
नवीन संधीकडे लक्ष ठेवावे. कामात चिकाटी ठेवावी लागेल. एखादी नवीन गोष्ट हाती लागू शकते. कुटुंबातील सदस्यांशी सलोखा ठेवावा. कौटुंबिक काळजी सतावत राहील.

मकर
मनातील संभ्रम काढून टाकावेत. स्थावर विषयक कामे निघतील. हाताखालील लोक चांगले मिळतील. सहकारी वर्गाकडून मदतीची अपेक्षा बाळगू नका. एकावेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका.

कुंभ
कामे योग्य पद्धतीने मार्गी लागतील. कामातून समाधान लाभेल. तुमचा उत्साह वाढीस लागेल. वाहन चालवताना सावधानता बाळगावी. मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवा.

मीन
शांत राहून परिस्थितीचा आढावा घ्यावा. कुटुंबियांसोबत वेळ घालवावा, त्यातून मानसिक समाधान लाभेल. भागीदारीच्या कामातून चांगला लाभ होईल. बुद्धी चातुर्यावर कामे पार पाडाल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button