इतर

युवा नेते प्रतीकभैय्या ठाणगे यांच्याकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

पारनेर प्रतिनिधी :

-सालाबादप्रमाणे याही वर्षी चालू असणाऱ्या श्री गणेश उत्सवाच्या निम्मिताने सोनारी युवा प्रतिष्ठान तिखोल ता.पारनेर यांनी गणेश उत्सवात दररोज लहान विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित केल्या जात होत्या.या स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या व उत्साहाच्या वातावरणात पार पडल्या.
यामध्ये निबंध लेखन, सुंदर हस्ताक्षर लेखन, चित्रकला, संगीत खुर्ची,चमचा लिंबू,प्रश्न मंजुषा अशा प्रकारे अनेक स्पर्धा घेण्यात आल्या .
दररोज पार पडणाऱ्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदवला.

स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या जवळपास एकूण 40ते45 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. त्यामध्ये वही, पेन,अंकलिपी व इतर शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी मा.चेअरमन नागचंद ठाणगे,
सोसायटी संचालक श्री.बाळासाहेब ठाणगे, मा.व्हा.चेअरमन श्री.सोनु मंचरे,योगेश ठाणगे,अंबादास ठाणगे,पंढरीनाथ ठाणगे, शिवाजी ठाणगे,
रोहित ठाणगे,भानुदास ठाणगे,मयूर ठाणगे,आप्पा ठाणगे,दत्ता ठाणगे, नाथा गुरुजी, विशाल ठाणगे, दत्ता बन्सी ठाणगे,गणेश ठाणगे,समाधान ठाणगे, चंद्रकांत ठाणगे, संतोष ठाणगे, रामदास ठाणगे,रावसाहेब ठाणगे,हर्षल ठाणगे, साहिल ठाणगे,राहुल ठाणगे, निखिल ठाणगे, सार्थक ठाणगे,सिद्धार्थ ठाणगे,आदित्य ठाणगे,सोहम ठाणगे,अजित ठाणगे आदी उपस्थित होते.


एक सामाजिक बांधिलकी म्हणून दरवर्षी सोनारी युवा प्रतिष्ठानच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात.याही वर्षी लहान विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करून त्यांच्यातील कलात्मक गुणांना वाव देण्याचा एक छोटासा प्रयत्न प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला.

कु.प्रतिक नागचंद ठाणगे
(देवकृपा प्रतिष्ठान,पारनेर तालुका)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button