शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी प्रश्नांवर रुपेश ढवण यांचे बुधवार पासून उपोषण

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी –
शेतकऱ्यांचे कर्जमाफी,कांदा भाव वाढ व निर्यात धोरण आणि इतर प्रश्नांसंदर्भात आपली माती , आपली माणसं या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष रुपेश ढवण हे बुधवार दि.२० पासून शेतकऱ्यांसमवेत शेतकऱ्यांसाठीच्या आरपार लढाईकरिता आमरण उपोषणाला बसणार आहेत.
युवा शेतकरी नेते रुपेश ढवण यांनी नुकतेच ४ दिवस यशस्वी अन्न त्याग आंदोलन केले.त्या आंदोलनाला राज्यभरातून शेतकरी, वारकऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिल्याने शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची व्याप्ती राज्यभरात झाल्याने राज्य विधानसभेच्या निवडणूकीत महायुतीतील घटक पक्षांनी आपल्या जाहिरनाम्यात शेतकरी कर्ज माफी जाहीर केली. निवडणूक होवून वर्ष पुर्ण होत आले तरी आश्वासन पाळले नाही.राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला कांदा भाव वाढ,त्यासाठी बांगला देश व इतर देशात कांदा निर्यात धोरण राबवण्यासाठी निर्यात खुली करावी, इतर शेती मालाला हमी भाव मिळावा म्हणून रुपेश ढवण यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न तडीस लावल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला.
बुधवार दि.२० पासून शेतकरी पुत्र रूपेश ढवण हे आमरण उपोषणाला बसणार असून त्यांच्या समवेत युवा कार्यकर्ते महेंद्र पांढरकर,देवराम लामखडे,पोपट तनपुरे,कचरू वरखडे,बाबाजी पठारे,दादा वराळ,संतोष लामखडे,संजय तनपुरे,अशोक शेटे,राजेंद्र वाळुंज,सोनी ताई पवार,नंदाबाई वरखडे,साखराबाई वरखडे,हिराबाई वराळ,बबिता काळे,शोभा ढवळे व इतर शेतकरी साखळी उपोषण करणार आहेत.
यावेळी शेतकरी पुत्र रूपेश ढवण यांचे आमरण उपोषणाला बसणार असून बुधवार दि.२० पासून ते शुक्रवार दि.२९ पर्यंत दररोज सायंकाळी ६ ते ७.१५ वाजेपर्यंत हभप अशोक कानडे महाराज , हभप तुषार गुंड , हभप धनंजय गोरडे , हभप बाळासाहेब पठारे , हभप सर्जेराव मस्कर , हभप बाबा खामकर , हभप श्रीराम घुले , हभप पोपट तनपुरे , हभप श्रीहरी पवार महाराज यांचे हरी प्रवचन होणार असून वेळेनुसार विविध गावातील भजनी मंडळाचा भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तदनंतर रात्री ७.३० ते ८.३० वाजेपर्यंत थोर अन्नदात्यांच्या लोकसहभागातून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .


