अवैध दारू विक्रीच्या विरोधात वारंघुशी फाटा येथे रविवारी रास्ता रोको आंदोलन

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील वारंघुशी गावात अवैध दारू गांजा विक्री सुरू आहे याबाबत प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही दखल न घेतल्याने प्रशासनाच्या विरुद्ध ग्रामस्थांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे
उद्या रविवार (दिनांक 7 )रोजी वारंघुशी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे
गावात चालू असलेले अवैध दारू धंदे, गांज्या विक्रेते यांना ग्रामपंचायत मार्फत अनेक वेळा अवैध दारू बंद करण्या बाबत पत्र व्यवहार,केला तोंडी समजूत दिली तरी सुद्धा ते आपला अवैध व्यवसाय बंद करत नाही. याबाबत त्यांची तक्रार राजूर पोलीस प्रशासनाला अनेक वेळा करूनही ते कोणतीही कठोर कार्यवाही करत नाही. या दारू मुळे गावातील अनेक कुटुंब उध्वस्त झाले आहेत
दारू, गांज्या मुळे आपल्या गावातील तरुण पिढी वाया जाताना दिसत आहे. त्याचबरोबर अनेक कुटुंबामध्ये वाद आणि अशांतता वाढली आहे, अनेक महिलांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे त्याचप्रमाणे गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व घटना आम्ही अनेक वेळा राजूर पोलीस प्रशासनाच्या निर्द्शनास आणून दिल्या परंतु त्यावर पोलीस प्रशासन कोणतीही योग्य कार्यवाही करत नसल्यामुळे येत्या रविवारी दि.07/09/2025 रोजी गावातील अवैध दारू, गांज्या विक्री च्या विरोधात आणि त्यांच्यावर योग्य ती कोणतीही कठोर कार्यवाही न करणाऱ्या राजूर पोलीस प्रशासनाच्या विरोधात वारंघुशी फाट्यावर रस्ता रोको आंदोलन आयोजित केले आहे
सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनवारंघूशी ग्रामपंचायत चे सरपंच फसाबाई बांडे उपसरपंच समीर मुठे, कमल घाणे यांनीं केले आहे



