शिक्षण व आरोग्य

श्री बाळेश्वर आश्रमशाळेचे प्राचार्य शिरोळे आदर्श शिक्षक पुरस्कारने सन्मानित!

संगमनेर प्रतिनिधी

श्री बाळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा सारोळे पठार ता. संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील प्राचार्य, श्री चंद्रकांत शिरोळे आदर्श शिक्षक पुरस्कारने सन्मानित झाले

रायझिंग ट्रायबल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी शिक्षक संघटना अहिल्यानगर यांच्या वतीने हा राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार 2025 रविवार दि. 13/9/2025 रोजी हॉटेल यश पॅलेस अहमदनगर येथे सदर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
.
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहिल्यानगर संचलित सदर आश्रम शाळेत 2007 मध्ये प्राचार्य या पदावर रुजू झाल्यानंतर आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बहुमोल असे कार्य त्यांनी केले आहे.
कोरोनाच्या साथीच्या कालावधीत सर्व ठिकाणी लॉकडाऊन असतात. शिक्षकांच्या मदतीने नाशिक दिंडोरी भागातील विद्यार्थ्यांपर्यंत अन्नधान्याच्या व किराण्याच्या किट्स पोहच केल्या.तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहावे यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेले ‘शिक्षण सेतू’, अभियान प्रभावीपणे राबवून विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व अध्यापन केले.

लॉकडाऊन च्या कालावधीत स्वयंसेवी संस्था व जिल्हा मराठा संस्थेच्या मार्फत मदत मिळवून मुलींच्या वस्तीगृहाचे काम पूर्ण केले. डिजिटल क्लासरूम अटल टिकरिंग लॅब. विविध क्रीडांगण विकास अनुदान मिळवून शाळेच्या भौतिक सुविधा वाढवल्या. स्पर्धा परीक्षा वर्ग ज्ञानवर्धिनी परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा, एकलव्य इंग्लिश मीडियम स्कूल प्रवेश
परीक्षा,यासारखे गुणवत्तापूर्ण उपक्रम शाळेत सतत राबवले जातात.सध्या पहिली ते बारावीचे वर्ग असून शाळेमध्ये शालेय परिसरासह नाशिक पुणे औरंगाबाद येथून 575 आदिवासी निवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
जिल्ह्यातील एक नामवंत आश्रमशाळा म्हणून या शाळेकडे पाहिले जाते अनेक विद्यार्थी दहावी व बारावी या परीक्षेत नाशिक विभागात प्रथम आलेले आहेत. आदिवासी विकास मंत्र्यांच्या मार्फत प्राचार्य शिरोळे तसेच विद्यार्थी शिक्षकांना गौरविण्यात आलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button