नवरात्री उत्सवा निमित्त एकदरे येथे सुरु असलेल्या हरीनाम सप्ताहाची सांगता

एस. के. जाधव /प्रतिनिधी
कोकणवाडी ता. अकोले. दि 4
अकोले तालुक्यातील मौजे चंदगीरवाडी,एकदरे येथे नवरात्री उत्सवा निमित्त सुरु असलेल्या अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता झाली.
श्री प्रभूरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चंदगीरवाडी, एकदरे येथे वैकुंठवासी ह.भ.प. कोंडीबा महाराज भांगरे,वैकुंठवासी ह.भ.प. रावजी महाराज बेंडकोळी यांच्या कृपाशिर्वादाने आणि सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्सहाने पार पडत असतो. सप्ताहासाठी सुश्राव्य हरिकिर्तन, प्रवचन, हरिपाठ, काकडा भजन, जागर होत असतो.
या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात सोमवार दिनांक २२.०९.२०२५ होऊन शनिवार दिनांक ४.०९.२०२५ तेरा दिवसा नंतर समाप्ती झाली. ह.भ.प. दिगंबर महाराज सोनवणे, बेलगाव तहाळे यांचे ” पाहता गवळी खाय त्यांची उष्टावळी ” या गौळणी वरती सुश्राव्य असे काल्याचे किर्तन झाले. किर्तनातून महाराजांनी समाज प्रबोधन केले.
यासाठी गायनाचार्य खंडू भांगरे, निवृत्ती भांगरे, अंकुश जावळे, विलास भांगरे, काकडा भजनासाठी देवराम भांगरे, पंढरी चौरे, भिमा हरि इदे मृदुंगाचार्य विशाल भागरे,अरुण भांगरे, भागा बेंडकोळी, चोपदार श्री मंगाजी कोरडे हार सेवा श्री राजू संतू भांगरे ( ग्रामपंचायत शिपाई ) यांनी केली. सागर भांगरे यांनी मंडप आणि साऊंड सिस्टीम दिली.

संत ज्ञानेश्वर प्रसादिक भजनी मंडळ, चंदगीरवाडी यांनी व परिसरातील सर्व शाळांनी सहकार्य केले. परिसरातील अनेक गावांनी या तेरा दिवसात हरिजागर केला. काल्याचे किर्तन संपल्यावर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.दुपारी दिंडी सोहळा पार पडला.
यावेळी माजी सरपंच यशवंत बेंडकोळी, गणपत बाबा भांगरे, सोमनाथ भांगरे, भजनी मंडळ, तरुण मित्र मंडळ व समस्त गावकरी उपस्थित होते.



