इतर

पत्रकार व लेखक संदीप वाकचौरे सोमवारी सहयाद्री वाहिनी वर!

संगमनेर प्रतिनिधी


येथील पत्रकार आणि लेखक संदीप वाकचौरे यांची सोमवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी दुपारी सहयाद्री वाहिनीवर हॅलो सहयाद्री या कार्यक्रमात मुलाखत प्रसारित केली जाणार आहे.या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांचा लेखन व शिक्षण प्रवास उलगडला जाणार असल्याची माहिती चपराक प्रकाशनाचे प्रमुख घनश्याम पाटील यांनी दिली.


संदीप वाकचौरे यांची चपराक प्रकाशनाच्या वतीने गेले दोन वर्षात शिक्षणावरील चौदा पुस्तके आणि एक संपादित पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.एकच प्रकाशक,एकच लेखक आणि एकच विषय असा स्वरूपात इतकी पुस्तके प्रकाशित होण्याचा हा राज्य भाषेतील पहिलाच प्रयोग मानला जात आहे.त्याच बरोबर संदीप वाकचौरे हे राज्य शासनाच्या विविध समित्यांवर काम करत आहेत.त्यांनी शासनाच्या राज्य अभ्यासक्रम व पुनर्रचना समिती,मूल्यमापन,शाळा बाहय मुलांचा अभ्यासक्रम,निवड,वरीष्ठश्रेणी अशा विविध स्वरूपाच्या प्रशिक्षणात साहित्य निर्मिती,संपादन व विकसनात सहभाग घेतला आहे.गेले अनेक वर्ष ते राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून राज्य स्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.त्याच बरोबर महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती मंडळाचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत.राज्याच्या शिक्षण संक्रमन,जीवन शिक्षण मासिकांच्या संपादन मंडळासाठी त्यांनी काम केले आहे.
महाराष्ट्रातील विविध नियतकालिकं,वृतपत्रामंध्ये गेले दोन दशकाहून अधिक विविध स्तभंलेखक म्हणून कार्यरत आहेत.त्यांची आजवर संपादन व लेखन अशी वीस पेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.या मुलाखती दरम्यान त्यांची जडणघडण,शैक्षणिक प्रवास आणि लेखनामागील प्रेरणा अशा विविध विषयांच्या अनुषंगाने प्रवास उलगडला जाणार आहे.त्यांची हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रसिध्द मुलाखतकार संजय भुजबळ यांनी मुलाखत घेतली आहे.सोमवारी दुपारी बारा ते एक या कालावधीत ही मुलाखत प्रसारित होणार आहे.अधिकाधिक श्रोत्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button