अमर सातपुते यांची आउटरिच युवक काँग्रेस संगमनेर तालुका महासचीवपदी निवड.

अकोले/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात व एकविरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा तसेच संगमनेर काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका आउटरीच युवक काँग्रेसची कार्यकारणी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
या कार्यकारणीमध्ये कासारा दुमाला गावातील बाळासाहेब थोरात यांचे निष्ठावंत युवक कार्यकर्ते अमर बाळासाहेब सातपुते यांची महासचीव पदी निवड करण्यात आली आहे. अमर सातपुते यांनी याआधी भोलेनाथ पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशा अनेक लहान मोठया पदांवर काम केले आहे.आपल्या कार्यकाळात त्यांनी चांगल्या पद्धतीने जबाबदारी पार पाडत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे..यामुळेच बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आउटरिच युवक काँग्रेस संगमनेर तालुक्यात महासचीव पदी त्यांची निवड करण्यात आली आहे. कासारा दुमाला सह घुलेवाडी,शिंदोडी,कऱ्हे,आश्वी बु,वेल्हाळे,सुकेवाडी,तळेगाव दिघे,नानज दुमाला,करूले,अंभोरे,दरेवाडी, कुंभारवाडी,वरवंडी,खराडी, जाखुरी,घुलेवाडी,गुंजाळवाडी, पारेगाव गडाख, गोडसेवाडी, धांदरफळ,जोर्वे, मालुंजे या गावातीलही तरूणांच्या निवडी विविध पदांवर करण्यात आल्या आहेत.
अमर सातपुते यांच्या नियुक्तीमुळे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. जयश्रीताई थोरात,विधान परिषद नाशिक पदविधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे,उपसभापती नवनाथ भाऊ अरगडे,सरपंच राजेंद्र त्रिभूवन, अमृतवाहिनी बँकेचे संचालक बाळासाहेब वाळके,संजय सातपुते,अर्जुन वाळके,रामनाथ वाळके,सकाहारी सातपुते, तुळशिराम सातपुते,हरीश वाळके,शरद खतोडे, दिनानाथ नाईक,राजू गुंजाळ,संतोष वाळके,जनार्दन जाधव,अंकूश भोकनळ, दिगंबर ताजने,निलेश गुंजाळ,अजय गुंजाळ,बाळासाहेब देवकर आदी मान्यवरांनी सत्कार केला. व शुभेच्छा दिल्या.
त्याचप्रमाणे कासारा दुमाला गावातील सरपंच, ग्रामस्थ,युवक कार्यकर्ते, जेष्ठ कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य, भोलेनाथ दुध उत्पादक सहकारी संस्था सर्व पदाधिकारी, भोलेनाथ ग्रामीण पतसंस्था सर्व पदाधिकारी, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सर्व पदाधिकारी,मानव विकास मंडळ सर्व पदाधिकारी तसेच गावातील सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ यांच्या वतीने त्यांचे स्वागत करू शुभेच्छा दिल्या आहेत


