इतर

शाळा ढोकरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थी संघाची स्थापना.


अकोले प्रतिनिधी
ज्यांना शाळेने घडवलं तेच माजी विद्यार्थी शाळेला घडवणार या राज्य सरकारच्या महत्त्वकांक्षी उपक्रमाची अंमलबजावणी राज्यातील सर्व शाळांना बंधनकारक केली याची तात्काळ अंमलबजावणी ढोकरी जिल्हा परिषद शाळेत करण्यात आली. शाळेच्या भौतिक विकासासाठी शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा सहभाग लाभावा व त्यातून गुणवत्ता विकास साधावा या हेतूने राज्य सरकारने यापूर्वी मिशन आपुलकीला स्थान म्हणून माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्याची आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत ढोकरी जिल्हा परिषद शाळेत माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यात आला आहे.
सेवानिवृत्त प्राचार्य श्री शांताराम प्रभू पुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ढोकरी शाळेत माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. संघ स्थापन करण्याची ध्येय व उद्देश यांची संकल्पना याविषयी मार्गदर्शन केले. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्षपदी सेवानिवृत्त प्राचार्य श्री शांताराम प्रभू पुंडे व उपाध्यक्षपदी श्री अशोक जयराम शेटे सर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तब्बल 50 विद्यार्थी सदस्य पदी तर शाळेचे मुख्याध्यापक श्री भास्कर कारभारी भाईक यांची सचिव पदी नेमणूक करण्यात आली. संघाचा उद्देश व कामकाज याची सविस्तर माहिती शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दत्तात्रय संपत शेटे यांनी दिली. यावेळी मिशन आपुलकी अंतर्गत ज्या पालकांनी शाळेला वस्तूरूपाने भेट दिली त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री शांताराम प्रभू पुंडे माजी प्राचार्य यांनी शाळेसाठी 7500 किमतीचे ढोल व लेझीम हे साहित्य दिले. श्री रमेश विलास गोपाळे मेजर सी एस आर पी जवान यांनी 12 हजार रुपये किमतीचे वॉटर फिल्टर मशीन भेट म्हणून दिले. श्री दत्तात्रय संपत शेटे यांनी सर्व विद्यार्थ्यांना तीन हजार रुपये किमतीचे आयडेंटी कार्ड बनवून दिले, श्री रवींद्र गेनू पुंडे यांनी 25 हजार रुपये किमतीचे प्रिंटर व दहा हजार रुपये किमतीचे कपाट शाळेला भेट दिले , श्री श्री कैलास पुंजा नवले सर यांचे मार्फत शाळा कमानी साठी 5001 रुपये सप्रेम भेट दिले त्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
माझी विद्यार्थी संघ स्थापनेनंतर एडवोकेट सौरभ गोविंद पुंडे तथा गोविंद पुंजा पुंडे यांचे मार्फत 3750 रुपये किमतीच्या पाच खुर्च्या शाळेला भेट देण्यात आल्या. श्री निलेश राघू यंधे यांनी तीन हजार रुपये किमतीचे मिक्सर शाळेला भेट दिले. सत्यम फर्निचर शेकडेवाडी चे मालक श्री मयूर तानाजी खतोडे यांनी चार हजार रुपये किमतीचे इडली मेकर शाळेला सप्रेम भेट दिले.
सर्व माजी विद्यार्थ्यांकडून सर्व मुलांना व माजी विद्यार्थ्यांना स्वादिष्ट भोजनाची मेजवानी दिली.
सदर कार्यक्रमासाठी श्री बाळासाहेब लक्ष्मण पानसरे, सौ बीजलाबाई अशोक कदम, संकेत पुंजीराम पुंडे, संकेत जिजाबा पुंडे, सचिन शंकर गुंजाळ, दत्तात्रय कुंडलिक सूर्यवंशी, दत्तात्रय शिवराम पुंडे, रामदास दत्तात्रय वाघ, निलेश राघू येंधे, विजय रखमा दौंड, अनिल अशोक कदम ,रोहिदास भास्कर पवार ,जीवन सोमनाथ मुठे, सौ लक्ष्मी यशवंत डोळस, मयूर बजरंग पुंडे, साहेबराव पुंजा घुले ,प्रशांत प्रभाकर शेटे ,कारभारी तबाजी शेटे, बबन धोंडीबा शेटे, अशोक जयराम शेटे, दत्तात्रय संपत शेटे, किसनराव रेवजी शेटे, शांताराम प्रभू पुंडे, संजय रामदास पाटोळे, निवृत्ती तबाजी शेटे, सौ संकेता पुंजीराम पुंडे ,सौ सोनाली विकास पुंडे इत्यादी माजी विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भास्कर कारभारी भाईक यांनी केले तर श्री चौधरी फक्कड नामदेव यांनी आभार मानले. शाळेला दिलेल्या योगदानाबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले ,सर्वांनी मदतीचे आश्वासन दिले व सर्व दात्यांचे अभिनंदन व आभार मानले….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button