नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग संदर्भात खा.भाऊसाहेब वाकचौरे रेल्वेमंत्र्यांना भेटले

नाशिक–पुणे रेल्वे मार्ग थेट असावा- खा. श्री भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह सर्वच खासदारांची आग्रही मागणी .
नवी दिल्ली: नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या नव्याने जाहीर झालेल्या शिर्डीमार्गे वळवलेल्या आराखड्याचा तातडीने पुनर्विचार करून सिन्नर–संगमनेर(अकोले)–नारायणगाव–मंचर–चाकण मार्गे थेट नाशिक–पुणे जोडणी द्यावी, अशी ठाम मागणी शिर्डीचे खासदार श्री भाऊसाहेब वाकचौरे यांनी रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. खासदार वाकचौरे यांच्यासह खा.राजाभाऊ वाजे, खा.अमोल कोल्हे, खा.भास्कर भगरे यांनी मंगळवार (दि. 16 डिसेंबर) रोजी नवी दिल्ली येथे रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन जनतेच्या भावना प्रत्यक्षरित्या मांडल्या.
या भेटीत नाशिक आणि पुणे या दोन महत्त्वपूर्ण औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी केंद्रांदरम्यान थेट रेल्वे जोडणीची दशकांपासूनची मागणी आता निर्णायक टप्प्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, GMRT संवेदनशील क्षेत्र टाळण्याच्या कारणामुळे मार्ग बदलला जात असला तरी मूलभूत प्रश्न कायम राहील असे न



