रोटरी क्लब ऑफ नाशिक चा स्थापना दिन उत्साहात संपन्न

* नाशिक प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नाशिकचा 81 वा स्थापना दिवस नुकताच उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे उपस्थित होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष डॉ. गौरव सामनेरकर होते. डॉ. सामनेरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले .रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या संचालकांनी त्यांनी वर्षभर केलेल्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे यांनी रोटरी क्लब ऑफ नाशिकने वर्षभरात केलेल्या सामाजिक कार्याचा ,रक्तदान शिबिराचा तसेच लोकोपयोगी विविध प्रकल्पांद्वारे जनतेच्या केलेल्या सेवेचे आपल्या मार्गदर्शनपर भाषणात कौतुक केले. जनसेवा करणे रोटरी क्लबचे ब्रीद आहे .त्याला अनुसरून रोटरी क्लब ऑफ नाशिकने केलेले कार्य हे खूपच स्तुत्य असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले .
त्यानंतर दसककर भगिनींनी ज्ञान सुरांची गाथा हा सुरेल गाण्यांचा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे संचालन सोनाली चिंधडे यांनी केले. सेक्रेटरी रेखा पटवर्धन यांनी आभार मानले .कार्यक्रमाला अनिल सुकेनकर ,दिलीप बेनिवाल, श्रेया कुलकर्णी ,मनीष चिंधडे, ओमप्रकाश रावत ,प्रफुल्ल बरडिया मकरंद चिंधडे कमलाकर टाक , मोना सामनेरकर ,राजश्री बालाजी वाले ,मंथ डायरेक्टर अॅड विद्युल्लता तातेड, मंथ लीडर रोहित देशपांडे तसेच सर्व संचालक मंडळ व रोटरीचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.



