नेप्तीत प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात ,गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान ,

अहिल्यानगर – नगर तालुक्यातील नेप्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन माजी सरपंच विठ्ठल जपकर, माजी सरपंच संजय आसाराम जपकर, उपसरपंच एकनाथ जपकर व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नानासाहेब होळकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक संजय अशोक जपकर होते.
यावेळी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून सत्कार करण्यात आला . या स्नेहसंमेलनाला ग्रामस्थांचा व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने संपूर्ण शाळावर आकर्षक विद्युत रोषणाई केली होती अशी माहीती रामदास फुले यांनी सांगितले

या कार्यक्रमात शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी हिंदी, मराठी गाणी, लावण्या , नृत्याविष्कार, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नाटिका सादर करत उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून भारतीय संस्कृतीचे सुंदर दर्शन घडलत होते. स्नेहसंमेलन कार्यक्रम पाहण्यासाठी सरपंच , उपसरपंच, सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य ,सोसायटी सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी , मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, ग्रामस्थ , महिला, पालक व परिसरातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे सर्व उपस्थितांनी कौतुक केले तसेच शाळेच्या विकासासाठी ग्रामस्थांनी भरभरून आर्थिक मदत दिली. कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका आशा ढोले , बाळासाहेब कापसे, बाळासाहेब नवले, नूतन पाटोळे, सविता गोरे, राजश्री कोल्हे ,मिराबाई जपकर ,शिक्षक व ग्रामस्थ यांनी उत्कृष्टरीत्या केले होते. यावेळी बाळासाहेब नवले सर यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. सरपंच सविता संजय जपकर यांनी कार्यक्रमासाठी पंचविस हजार रुपयाची देणगी दिली.


