अकोले – परेल एसटी बस सेवा पूर्ववत सुरू होणार!

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील प्रवाशांची मागणी लक्षात घेता अकोले आगाराने अकोले- परेल ही प्रवासी एसटी बस सेवा पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला असून एक ऑगस्ट पासून ही बस सेवा पूर्ववत सुरू होणार आहे
सुमारे एक वर्षापासून ही बस सेवा बंद होती प्रवाशांच्या मागणीनुसार व प्रवासी संघटनांच्या पाठपुराव्याने दिनांक ०१/०८/२०२५ पासून सुरु होणारी ही बस सेवा सकाळी ९.०० वाजता अकोले येथून परेल मुक्काम करीता बस सेवा सुरू करण्यात येणार आहे ही बस कोतूळ-ब्राह्मणवाडा-बेलापूर-बोटा-आळेफाटा-ओतूर माळशेज मार्गे टोकवडे-मुरबाड-कल्याण ठाणे-घाटकोपर-सायन-दादर-मार्गे परेल ला पोहचेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ५.४५ मिनिटांनी परेल येथून पुन्हा परेल,- दादर -सायंन- घाटकोपर- ठाणे-कल्याण- मुरबाड माळशेज मार्गे ओतृर- आळेफाटा- बोटा -बेलापूर -ब्राम्हणवाडा- कोतुळ मार्गे अकोले ला पोहचेल ही बस सेवा वर्षाभरापासुन बंद होती बस सेवा बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती बस सेवा पुन्हा पूर्ववत सुरू करावी या मागणीसाठी सह्याद्री आदिवासी सेवा संघ मुंबई प्रवासी संघटना यांनी सातत्याने पाठपुरावा केला
या बस सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आव्हान अकोले आगार व्यवस्थापक सुरेश दराडे कंट्रोल ऑफिसर सागर सांगळे सह्याद्री आदिवासी प्रवासी संघटना मुंबई चे अध्यक्ष रामनाथ भोजने सचिव भाऊसाहेब जगधने यांनी केले आहे



