आमदार अमोल खताळ म्हणाले माझ्या विजयात अकोले तालुक्यातील अनेक दृश्य-अदृश्य हात होते

कोतुळ प्रतिनिधी
तिसऱ्या श्रावणी सोमवारी आज अकोले तालुक्यातील श्री क्षेत्र कोतुळेश्वर देवस्थान कोतुळ येथे आज हजारो भाविकांनी दर्शन घेतले आज सकाळी अकोल्याचे तालुक्याचे माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या हस्ते कोतूळेश्वर मंदिरात अभिषेक करण्यात आला त्यानंतर संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ नीलम ताई खताळ यांचे हस्ते महापूजा करण्यात आली
यावेळी कोतुळेश्वर देवस्थान चे अध्यक्ष सुरेशराव कोते हभप रामनाथ महाराज जाधव , दीपक महाराज देशमुख, ह भ प नितीन महाराज गोडसे ,राजेंद्र पाटील देशमुख गणेश पोखरकर, रवीन्द्र आरोटे, अभिजीत देशमुख, बाबासाहेब देशमुख,, नेताजी आरोटे, योगेश देशमुख, हेमंत देशमुख ,,आदी सह ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भावीक भक्त उपस्थित होते

विकासा साठी संगमनेर- अकोल्याचे भावा-भावाचे नाते यापुढे सुरू राहावे – आमदार अमोल खताळ
आमदार खताळ यांनी कोतूळेश्वर महापूजा केल्यानंतर देवस्थान चे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी ते म्हणाले की अतिशय पवित्र आणि पावन असा हा महिना श्रावण महिना ओळखला जातो त्यामध्ये तिसऱ्या सोमवार निमित्त पहिल्यांदाच कोतुळेश्वराच्या दर्शनाला आलोय पण आल्यानंतर खरंच खूप प्रसन्न वाटलं ,कोतूळेश्वर महाराजांना प्रार्थना केली संगमनेर आणि अकोला हे भावा-भावाचं नातं आहे हे विकासाच्या बाबतीत सुद्धा पुढे राहिले पाहिजे
सांगतो काम करायचं तर देशासाठी करायचं धर्मासाठी करायचं कारण आज आपल्या हिंदुस्तान मध्ये छत्रपती शिवाजी महाराज तसेच कितीतरी महान थोर संत महंत होऊन गेले आणि आज ही वारकरी संप्रदायाची परंपरा पुढे चालली आज प्रत्येक गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह असेल किंवा इतर धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गावातील सौंदर्यपूर्ण वातावरण अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व मिळून मिसळून वागत असतात कोतुळेश्वर देवस्थानने केलेल्या विकास कामांचे कौतुक करत त्यांनी देवस्थान कमिटीचे त्यांनी अभिनंदन केले
मंदिर परिसरात अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे आलेला भक्त हा दर्शन घेतल्यानंतर बाहेर दोन मिनिटांनी निसर्गाच्या सानिध्यात सुद्धा रंगतो आणि हीच खरी आपल्या मंदिराची धार्मिक स्थळांची शक्ती येथे आल्यानंतर माणूस असा प्रसन्न राहिला पाहिजे
माझ्यावर प्रेम करणारे अकोले तालुक्यात अनेक अदृश्य दृश्य हात होते त्यांनी त्यांच्या संगमनेरातील नातेवाईकाना सांगून मला एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून काम करण्याची संधी दिली असा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला
गेल्या सात – आठ महिन्यापासून मी काम करतो पण कामाची पद्धत वेगळी आहे कोतुळेश्वर महाराजांच्या साक्षीने सांगतो की मी ज्या गावांमध्ये मतदान झाले नाही त्यांचे सुद्धा काम करतो यावेळी लिज्जत पापड चे कार्यकारी संचालक देवस्थानचे अध्यक्ष सुरेशराव कोते, ह भ प दीपक महाराज देशमुख यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले रवींद्र आरोटे यांनी सूत्रसंचालन केले

