डॉ धर्मराज सुरोसे यांचा “रक्षाबंधनास वृक्ष भेट” उपक्रम

शेवगाव दि 13
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य तसेच वनश्री प्रमोददादा मोरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या “रक्षाबंधनास वृक्ष भेट” या उपक्रमाचा एक भाग म्हणून निसर्गाची होत असलेलीअसलेली बेसुमार वृक्षतोड, वातावरणात होणारा बदल, निसर्गाचा बिघडत असलेला समतोल, पर्यावरणाच्या दृष्टीने जीवनसृष्टीचे संतुलन, नैसर्गिक आपत्ती पासून संरक्षण, यासाठी वृक्ष लागवड हा एक चांगला उपक्रम असून यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा असा संदेश देण्याचा छोटासा प्रयत्न महात्मा फुले ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळाचे समन्वयक डॉ.धर्मराज सुरोसे (मानद पशुकल्याण अधिकारी) ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया यांनी रक्षाबंधनानिमित्त प्रथम स्वतः बहिणीला रक्षाबंधन साजरे करण्या अगोदर योगिताताई आधाट यांना रक्षाबंधनास वृक्ष भेट देऊन या उपक्रमात सहभाग नोंदवला.



