इतर

नगर तालुक्यातील अनेक वर्षांपासून बंद असलेला जखणगाव येथील शेतरस्ता पुन्हा खुला,

शेतरस्ते मार्ग नसून शेतकऱ्याच्या जीवनवाहिन्या: प्रताप कळसे

अहिल्यानगर (प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या दि. 02/09/2025 रोजीच्या आदेशानुसार, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन (दि. 17 सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (दि. 02 ऑक्टोबर) या कालावधीत ‘सेवा पंधरवाडा’ साजरा होत आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने दि. 01/10/2025 रोजी मौजे जखणगाव येथील गट नंबर 55 मधील अनेक वर्षांपासून बंद असलेला शेतरस्ता अखेर खुला करण्यात आला आहे.
सदर शेत रस्त्यातील अडथळे जेसीबीच्या साह्याने दूर करून सदर शेत रस्ता जेसीबीच्या सहाय्याने तयार करण्यात आला. या कामासाठी मा. उपविभागीय अधिकारी श्री. सुधीर पाटील साहेब, मा. तहसीलदार श्री. संजय शिंदे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले.या वेळी नेप्ती मंडळ अधिकारी प्रताप कळसे , सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, ग्राम महसूल अधिकारी जखनगाव सौ. दिपाली विधाते, ग्राम महसूल अधिकारी हिंगणगाव दीपक झेंडे, सरपंच जखनगाव डॉ. सुनील गंधे, सरपंच हिंगणगाव श्री. पोपटराव ढगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. रामदास सोनवणे, उपसरपंच हिंगणगाव श्री. अशोक सोनवणे, जेष्ठ नागरिक श्री. दादाभाऊ सोनवणे, श्री. सुदाम सोनवणे, ऍडव्होकेट संतोष कांडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
हा रस्ता खुला झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीकामांसाठी ये-जा सुलभ झाली असून कृषी विकासाला चालना मिळणार आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाचे मनापासून आभार मानले.

सर्वांनी एकत्रितपणे गावातील अनेक वर्षांपासून बंद असलेला शेतरस्ता खुला केला आहे, ही खरोखरच आनंदाची बाब आहे. शासनाचे आदेश आणि प्रशासनाचे मार्गदर्शन याबरोबरच ग्रामस्थांच्या एकजुटीमुळेच हे शक्य झाले आहे.
रस्ते बंद राहिल्याने शेतीला वाव मिळत नाही, उत्पादन बाजारापर्यंत पोहोचणे कठीण होते आणि विकासाला अडथळा निर्माण होतो. आज झालेल्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी सोयीस्कर मार्ग उपलब्ध झाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने नेप्ती या महसूल मंडळात एकूण 3 रस्ते खुले झाले याचा अभिमान वाटतो. पुढेही गावोगाव असे उपक्रम राबवून शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्याचा आमचा प्रयत्न राहील. ग्रामस्थांनी प्रशासनाला नेहमी सहकार्य करावे तसेच शेत रस्ते हे केवळ मार्ग नसून शेतकऱ्यांच्या जीवनवाहिन्या आहेत असे प्रतिपादन नेप्ती मंडळ अधिकारी प्रताप कळसे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button