महागणपती मल्टीस्टेट तर्फे सभासदांना दिवाळी फराळ व पैठणी भेटवस्तूचे वाटप

अकोले प्रतिनिधी
महागणपती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे वतीने दीपावलीनिमित्त सभासदांना दिवाळी फराळ व पैठणी साडी चे वाटप करण्यात आले.
संस्थेचे संस्थापक चेअरमन विकास बेंगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. पुरूष सभासदांना ४ किलो पारंपरिक दीपावली फराळ भेट म्हणून देण्यात आले. तसेच संस्थेच्या महिला सभासदांना आकर्षक मुनिया येवला पैठणी साडी दीपावली निमित्त भेट देण्यात आली.
संस्थेचे संचालक योगेश जाधव यांच्या उपस्थितीत कोतुळ (तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर ) येथील संस्थेच्या शाखेत सभासदांना या दिवाळी फराळाची भेट देण्यात आली
महागणपती मल्टीस्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे दहा हजार रूपये प्रेफरन्स शेअर्स घेतल्यावर सभासदांना १५ टक्के खात्रीशीर लाभांश दिला आतो. तसेच दरवर्षी सभासदांना दिवाळीत भेटवस्तू, उन्हाळ्यात रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी दिली जाते. तसेच सभासदाचा ५ लाख रूपयांचा अपघाती मृत्यू विमा काढला जातो. तसेच १० हजार रूपयांचे वैद्यकीय अनुदान दिले जाते. सभासदांना आर्थिक साक्षरता शिबिरांचा लाभ मिळतो. महागणपती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात 22 शाखा आहेत

राजगुरूनगर,चिंचवड, चिखली, आळंदी,चाकण,नारायणगाव, जुन्नर, ओतूर, कोतुळ, आळेफाटा, सविंदणे, कवठे येमाई, निघोज, शिवणे, मोशी, भोसरी, बारामती, शिक्रापूर, निगडी, सातारा, मसूर इत्यादी शाखा असून, या सर्व शाखांमध्ये दीपावली भेटवस्तूचे वितरण फक्त तीन दिवसांत पूर्ण केले असल्याचे संस्थेचे संस्थापक व चेअरमन विकास बेंगडे पाटील यांनी सांगीतले.
मल्टीस्टेट इव्हेंट मुख्य कार्यकारी अधिकारी समाधान सन्नके, व्हि.बी.पी. ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर देशमुख, इव्हेंट व्यवस्थापकः उदय पाठक, प्रशांत वहिले, ऑपरेशन मॅनेजर रवींद्र हगवणे, अर्जुन दुधवडे, आयटी विभाग प्रमुख राम बल्लाळ, शुभम देवके, एच. आर व्यवस्थापक स्वाती कुन्हाडे याच्यासह सर्व शाखा व्यवस्थापक व कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
मुख्य कार्यालय मोशी येथे झालेल्या सांगता समारंभात संस्थेचे संस्थापक चेअरमन विकास विकास बेंगडे पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र हुले, नीलम बेंगडे पाटील यांनी सभासद व कर्मचारी वर्गाला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. “महागणपती मल्टीस्टेटमध्ये फक्त आर्थिक व्यवहार नाही, तर हा एक परिवार आहे. प्रत्येक सभासदाच्या घरात दिवाळीचा सण आनंदाने साजरा व्हावा,” असे चेअरमन विकास बेंगडे पाटील यांनी सांगितले.
———–


