इतर

अकोल्यातील पल्लवी बांडे बनली क्लास वन अधिकारी!

अकोले प्रतिनिधी 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC 2024-25) मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत कु. पल्लवी नामदेव बांडे हिने उल्लेखनीय यश संपादन करून महाराष्ट्र राज्यामधून वर्ग–1 (Class–1) अधिकाऱ्याच्या पदावर निवड मिळवली आहे.

अकोले तालुक्यातील दुर्गम आदिवासी गाव असणाऱ्या  कोदणी गावचे तिने नाव रोशन केले आहे   

कु. पल्लवी हिचे वडील नामदेव बांडे सर हे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक असून ती सामान्य घराण्यातील असूनही शासकीय (Government) शाळेमध्ये शिक्षण घेऊन .तिने  कष्ट व जिद्दीने आपल्या चिकाटीच्या बळावर तिने हे यश संपादन केले आहे.

या घवघवीत यशाबद्दल कोदणी गावाच्या  तरुण मंडळ व ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहे 

पल्लवी ताई च्या यशामागे कुटुंबीयांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे योगदान आणि तिच्या परिश्रमांचा मोठा वाटा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button