अमृता फडणंवीस यांचा एक अध्याय पूर्ण आता पुढील आध्याय राजकारण?

मुंबई दि 19 अमृता फडणवीसांनी ‘ॲक्सिस बँके’तील आपल्या नोकरीचा स्वेच्छेने राजीनामा दिला आहे त्यांनी आपल्या नोकरीचा एक अध्याय पूर्ण केला असून आता राजकारणाचा नवीन अध्याय त्यांचा सुरू होणार की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ॲक्सिस बँकेतील नोकरीचा राजीनामा दिला आहे. या संदर्भातील माहिती अमृता फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
अमृता फडणवीस यांनी जवळपास २३ वर्षे बँकिंग क्षेत्रात काम केलं आहे. २३ वर्षे बँकिंग क्षेत्रात काम केल्यानंतर आज अमृता फडणवीस यांनी त्यांच्या नोकरीचा स्वेच्छेने राजीनामा दिला असल्याचं त्यांनीच एक्सवरील (ट्विटर) पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे.
‘मी २३ वर्षांपूर्वी एक व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून अॅक्सिस बँकेत रुजू झाले होते. पण आज मी वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. यावेळी माझं हृदय कृतज्ञतेनं भरून आलं आहे. शाखा कामकाजापासून ते कॉर्पोरेट बँकिंग आणि ट्रेझरी ते ग्राहक संबंधांपर्यंतच्या अनुभवामुळे ही संस्था माझ्यासाठी कुटुंब, शिक्षक आणि दुसरं घर राहिली. बँकेतील माझे सर्व सहकारी आणि वरिष्ठ, विशेषतः एमडी आणि सीईओ अमिताभ चौधरी यांच्या पाठिंब्याबद्दल मी आभारी आहे. हा सुंदर अध्याय येथे संपत असताना मी आयुष्यभराचे धडे आणि मैत्री घेऊन जात आहे. धन्यवाद, अॅक्सिस बँक’, असं अमृता फडणवीस यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.



