शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखडा संवर्धित करणारी रयत ही पहिली शिक्षण संस्था —चंद्रकांत दळवी

: उत्तर विभागीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली
“अहिल्यानगर दि 15
रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा सातत्याने विकास व्हावा आणि बदलत्या शैक्षणिक गरजांनुसार शिक्षक व प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम व्हावी या उद्देशाने ‘रयत शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखडा २०२६’ या विषयावर उत्तर विभागीय कार्यशाळेचे आयोजन उत्तर विभागीय कार्यालय, अहिल्यानगर येथे करण्यात आले.गुणवत्तेवर विकासात्मक आराखडा संवर्धित करणारी रयत ही राज्यातील पहिली व एकमेव संस्था आहे असे गौरवोद्गार
कार्यशाळेचे मार्गदर्शक व अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री. चंद्रकांत दळवी (IAS Retd.) या नी काढले.
त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यशाळेला विशेष दिशा लाभली. या प्रसंगी संस्थेचे व्हाइस चेअरमन मा. ॲड. भगीरथ शिंदे उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना श्री. चंद्रकांत दळवी यांनी रयत शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखडा २०२६ या संकल्पनेविषयी सविस्तर माहिती दिली. पायाभूत भौतिक व शिक्षणातील गुणवत्ता वृद्धीसाठी आवश्यक असलेले आधुनिक अध्यापन तंत्र, विद्यार्थीकेंद्रित शिक्षण पद्धती, मूल्यमापनातील नव्या संकल्पना तसेच शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर त्यांनी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात त्यांनी शाखाप्रमुखांनी शिक्षण प्रक्रियेत नव्या कल्पना आत्मसात करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. रयत शिक्षण संस्थेच्या परंपरेला साजेशा गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा खासदार शरदचंद्र पवार यांच्या विचारांची अंमलबजावणी करण्यासाठी व ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्यासाठी हा गुणवत्ता विकास आराखडा निश्चित दिशादर्शक ठरेल.
या कार्यशाळेत संस्थेचे सचिव श्री. विकास देशमुख (IAS Retd.) भौतिक सुविधा सहसचिव (माध्यमिक) प्रा. बंडू पवार, प्राथमिक , माध्यमिक विकास,सहसचिव (ऑडिट) डॉ.राजेंद्र मोरे यांनी उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालये, डॉ.शिवलिंग मेनकुदळे सहसचिव (उच्च शिक्षण )यांनी रयत स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी अशा शैक्षणिक उपक्रम व अकॅडमी संदर्भात आराखड्यावर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे उद्घाटन कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून चेअरमन व मॅनेजिंग कौन्सिल तसेच संस्थेचे अधिकारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक व स्वागत उत्तर विभागीय चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी केले आपल्या प्रास्ताविकात त्यांनी उत्तर विभाग गेल्या पाचसहा वर्षात गुणवत्तेत अग्रस्थानी आहे असे सांगितले, विद्यार्थी संख्या या काळात वाढलेली आहे विविध स्पर्धा परीक्षांत विद्यार्थी संख्या लक्षणीय वाढत गेलेली आहे.तसेच विभागातील भौतिक शैक्षणिक व तांत्रिक सुविधांची माहिती दिली. उत्तर विभागीय विकासवर्धन या वार्षिक अंकाचे प्रकाशन मा चेअरमनसाहेब चंद्रकांत दळवी यांचे शुभहस्ते करण्यात आले.
द्वितीय सत्रात व्हाईस चेअरमन ॲड.भगीरथ शिंदे यांनी मार्गदर्शन करताना संस्थेच्या इतिहासाचा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या परंपरेचा आढावा घेत आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले.
कार्यशाळेत उपस्थित प्राचार्य, मुख्याध्यापक व अधिकाऱ्यांनी विविध मुद्द्यांवर आपले अनुभव, शंका आणि सूचना मांडल्या. गुणवत्ता विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल याबाबत सविस्तर चर्चा झाली.
या संवादातून अनेक विधायक सूचना पुढे आल्या.
कार्यशाळेला संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, जनरल बॉडी सदस्य, लाईफ मेंबर, लाईफ वर्कर तसेच उत्तर विभागातील प्राचार्य, मुख्याध्यापक व टेक्नोसॅव्ही शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकूणच रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी दिशा देणारी आणि शिक्षकांना प्रेरणा देणारी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरली.
सहभागी मुख्याध्यापकांनी या कार्यशाळेतून मिळालेल्या मार्गदर्शनाच्या आधारे आपल्या शाळांमध्ये गुणवत्ता वृद्धीसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे यांनी उपस्थितांचे गुलाब पुष्प व ग्रंथ भेट देऊन स्वागत केले.या कार्यशाळेस मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, मीनाताई जगधने, राहुल जगताप, तसेच जनरल बॉडी सदस्य, लाइफ मेंबर लाइफ वर्कर प्राचार्य, सहाय्यक विभागीय अधिकारी बाबासाहेब नाईकवाडी, प्रमोद तोरणे व सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते.कार्यशाळेचे सूत्रसंचालन विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे यांनी केले.



