इतर

प्रवरानगर येथे जलसंपदा विभागाच्या राज्यस्तरीय पंचक २०२६, क्रिकेट स्पर्धेचा रंगतदार शेवट.



इंजी. संतोष अडाकुल /संजय उकिरडे

प्रवरानगर (लोणी) : येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रिकेट मैदानावर झालेल्या राज्यस्तरीय पंचक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात MKVDC पुणे (या संघात पुणे, सोलापूर, कोल्हापुर, सांगली, सातारा खेळाडूंचा समावेष) संघाने KIDC ठाणे (कोकण) संघावर रोमांचक विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा व पाचपैकी तिसऱ्यांदा चॅम्पियनशिप पटकावली. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्याने उपस्थित प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या KIDC कोकण संघाने १० षटकांत १४५ धावांचा भक्कम डोंगर उभा केला. कर्णधार महेश मुंडे यांनी तुफानी फलंदाजी करत शतकी खेळी साकारली. विविध फटक्यांची आतषबाजी करत त्यांनी MKVDC च्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले.

१४६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना MKVDC पुणे संघाने आक्रमक सुरुवात केली. युवा फलंदाज हर्षद कारंडे यांनी १३ चेंडूत ३३ धावांची धडाकेबाज खेळी करत संघाला वेगवान सुरुवात करून दिली. त्यानंतर कर्णधार हनुमंत गाडे यांनी अवघ्या १७ चेंडूत ५१ धावांची वादळी खेळी करत षटकार, चौकारांची बरसात केली व संघाच्या विजयाचा भक्कम पाया रचला.

सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात परिस्थिती अत्यंत चुरशीची झाली असताना मुस्ताक याने अवघ्या १४ चेंडूत नाबाद ४१ धावांची स्फोटक खेळी करत निर्णायक षटकार ठोकला आणि संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्याला अभिषेक गायकवाड यांनी संयमी तथा विजयी साथ दिली.

या विजयानंतर MKVDC समर्थकांनी मा. कार्यकारी संचालक श्री धुमाळ साहेबानी मैदानावर जल्लोष साजरा केला.
दुसरीकडे कर्णधार महेश मुंडे यांच्या शतकी खेळी असूनही KIDC कोकण संघाला पराभव स्वीकारावा लागला.

स्पर्धेत प्रशांत माने, रविराज घाडगे, निलकंठ मनाले आणि मोहित , मेहराज शेख यांच्या प्रभावी कामगिरीमुळे MKVDC पुणे संघाची विजयी घोडदौड अधिक भक्कम झाली.

मा. कार्यकारी संचालक श्री धुमाळ साहेबानी प्रथमच साता-याचे अधीक्षक अभियंता अभय काटकर यांच्यावर सोपविली होती.

त्यानी संघाची अचूक निवड, शिस्तबद्ध नियोजन आणि प्रभावी नेतृत्व यामुळे अधीक्षक अभियंता अभय काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली MKVDC पुणे संघाने पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध केला. त्यांच्या सोबत उपअभियंता किरण कानगुडे व हेमंत घोलप यांनीही संघास सातत्याने मार्गदर्शन केले. महिला संघानेही या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली.

या स्पर्धेत MKVDC पुणे पुरुष क्रिकेट संघाने विजेतेपद पटकावले असून संघाचे कर्णधार हनुमंत गाडे, तसेच महिला क्रिकेट संघाच्या उपविजेत्या संघाच्या कर्णधार नेहा मोहिते यांना मा. जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते भव्य दिव्य अशा खचाखच भरलेल्या समारंभात चषक देऊन गौरविण्यात आले.

अत्यंत रंगतदार ठरलेला हा अंतिम सामना क्रिकेटप्रेमींसाठी दीर्घकाळ स्मरणात राहील, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button