अकोल्यात समता परिषद व ओबीसी संघटनेने केला गुणवंतांचा सत्कार!

अकोले प्रतिनिधी
महात्मा फुले समता परिषद अकोले व सकल ओबीसी समाजा चे वतीने शासकीय स्पर्धा परिक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा अकोले जि.अहिल्यानगर येथे सत्कार करण्यात आला
माळीझाप येथील श्रेयस दिलीप मंडलिक यांची mpsc परीक्षेतून संपूर्ण महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाने निवड होऊन सहाय्यक नगर रचनाकार श्रेणी १ या राजपत्रित पदावर नियुक्ती झाल्याबद्दल
यावेळी मार्तंड कचरू भरीतकर यांची( IBPS) परीक्षेमार्फत सेंट्रल बँक ऑफ इंडिया ज्युनिअर असिस्टंट पदी नियुक्ती झाल्याने तसेच विश्वास पांडे यांची CRPF मध्ये व प्रतीक पांडे यांची ठाणे शहर पोलीस पदी नियुक्ती झाल्याने त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.या गुणवंतांच्या सत्कारा बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या तालुकाध्यक्षपदी प्रवीण शिंदे, उपाध्यक्ष पदी बाळासाहेब वाकचौरे, अकोले शहराध्यक्षपदी शैलेश जाधव निवड झाल्याने त्यांचाही सत्कार
समता परिषदेचे तालुका अध्यक्ष नवनाथ गायकवाड अगस्तीचे संचालक बाळासाहेब ताजणे, रामनाथ शिंदे,बाळासाहेब मेहेत्रे समता परिषद कार्याध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल अकोले तालुका उपाध्यक्ष किशोर झोडगे, मनसे शहराध्यक्ष शिवाजी गायकवाड,नवनाथ पांडे यांच्या पुढाकारातून अकोले तालुका समता परिषद व सकल ओबीसी समाजाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार आयोजित करण्यात आला होता .

यावेळी अकोले नगरपंचायत चे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, गुरव समाज जिल्हा अध्यक्ष अशोक पांडे,परीट समाज प्रदेशाध्यक्ष मनोज गायकवाड , माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष,रामनाथ शिंदे,बेलदार समाजाचे नेते विष्णू कर्णिक, नाभिक समाजाचे बाळासाहेब मदने ,नवनाथ पांडे , दत्ता बनवणे, सोमनाथ बाळसराफ, आखिल.भारतीय अंधश्रधा निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष गुलाबराव मंडलिक, तेली समाज संघटनेचे अशोक शिंदे, कम्युनिस्ट पक्षाचे,गणेश ताजने , ज्ञानेश्वर चौधरी, दिलीप मंडलिक, अनिल मंडलिक, सोनार समाज संघटनेचे जग्गू शेठ मैड,मारुती चौधरी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.


