इतर

नेप्तीत खरीप हंगाम पूर्व तयारी कार्यक्रम

शेतकऱ्यांना शाश्वत शेती समृद्धीकडे नेईल – सहाय्यक कृषी अधिकारी नवले . .


. अहिल्यानगर : प्रतिनिधी

– नगर तालुक्यातील नेप्ती येथील मारुती मंदिरात कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम पूर्व तयारी नियोजन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोफत जैविक निविष्ठांचे वाटप करण्यात आले .या कार्यक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .आगामी खरीप हंगाम लक्षात घेऊन विविध पिकांच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अशी माहिती रामदास फुले यांनी दिली. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली.

सभेमध्ये बीज प्रक्रिया, बियाण्यांची उगवण क्षमता चाचणी, तसेच हुमणी किड नियंत्रण यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी आवश्यक उपाययोजना समजून घेण्यास मदत झाली. कृषी विभागाच्या योजनांची माहितीही यावेळी देण्यात आली.
रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना, तसेच ‘महाविस्तार AI’ ॲपचा प्रचार- प्रसार करण्यात आला. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती, हवामान अंदाज व मार्गदर्शन सहज उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी अशोक वाळके व उपकृषी अधिकारी अश्विनी भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी नवले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या बदलत्या हवामान परिस्थितीत पारंपरिक शेती सोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य बीज प्रक्रिया, संतुलित खत व्यवस्थापन आणि कीड नियंत्रण यावर भर दिल्यास उत्पादनात निश्चित वाढ होऊ शकते. त्यांनी शेतकऱ्यांना शाश्वत शेती पद्धती स्विकारण्याचे आवाहन केले .सरकारच्या विविध योजनांचा योग्य लाभ घेतल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल. ‘महाविस्तार AI’ सारख्या डिजिटल साधनांचा वापर करून शेतकरी अधिक सक्षम होऊ शकतात.कृषी विभाग सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा असून आवश्यक ते मार्गदर्शन व सहाय्य देत राहील. शाश्वत शेतीचा अवलंबच शेतकऱ्यांना समृद्धीकडे नेईल असे प्रतिपादन नेप्ती सहाय्यक कृषी अधिकारी रावसाहेब नवले यांनी केले.


या कार्यक्रमाला सहाय्यक कृषी अधिकारी रावसाहेब नवले , सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, कृषी मित्र अजय कर्डिले तसेच शेतकरी सोन्याबापु कानडे, रावसाहेब पुंड, सबाजी कांडेकर, बबन सय्यद, लहू होळकर, दत्तात्रय फुले, मारुती गाडेकर, विष्णू दरेकर, देवराम जपकर, बाबासाहेब रावळे, दिगंबर जपकर बाबासाहेब ठुबे व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीरित्या केल्याबद्दल सहाय्यक कृषी अधिकारी रावसाहेब नवले साहेब यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले. . . .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button