नेप्तीत बकरी ईद उत्साहात साजरी; नमाज पठणातून शांतीचा संदेश,

बकरी ईद त्यागाचा संदेश देणारा सण –माजी उपसरपंच फारुक सय्यद
अहिल्यानगर: प्रतिनिधी-
नगर तालुक्यातील नेप्ती येथे मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद अत्यंत उत्साहपूर्ण आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नमाज पठण केले.
यावेळी देशात शांतता, सामाजिक सलोखा आणि सर्वधर्मीयांमध्ये बंधुभाव कायम राहावा यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. गावात सर्वत्र आनंदाचे वातावरण असून एकमेकांना शुभेच्छा देत बकरी ईदचा सण साजरा करण्यात आला.
यावेळी माजी उपसरपंच फारुख सय्यद, सरपंच संजय अशोक जपकर, माजी उपसरपंच संजय आसाराम जपकर, समता परिषदेचे तालुका अध्यक्ष रामदास फुले, माजी उपसरपंच जालिंदर शिंदे, उत्तम फुले, मौलाना मुनीर सय्यद, ग्रामपंचायत सदस्य दादु चौगुले, प्रा. बाबुलाल सय्यद, हुसेन सय्यद, गुलाब सय्यद, अजर सय्यद, बबन सय्यद, जावेद सय्यद, जमीर सय्यद, मुनीर सय्यद, मेहबूब सय्यद, सादिक सय्यद, वाजीद सय्यद, मुक्तार सय्यद, नौशाद शेख, सिकंदर शेख, सलीम सय्यद, युनूस सय्यद, हन्सार सय्यद, कयूम सय्यद, उमर सय्यद, नावेद सय्यद, रमिज सय्यद, आदिल सय्यद, परवेज सय्यद, बादशाह सय्यद, रफिक सय्यद, वासिम सय्यद, मोईन सय्यद, आसिफ सय्यद, आसिफ शेख, एजाज सय्यद, सबाजी कांडेकर, प्राध्यापक एकनाथ होले, मच्छिंद्र होळकर, गुलाब राऊत, भाऊ होळकर, गोपीनाथ होळकर, सुरेश कदम ,रावसाहेब पुंड नसीर सय्यद आदींसह नाले हैदर यंग पार्टी, दोस्ती तरुण मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सणानिमित्त गावात सामाजिक ऐक्य आणि परस्पर स्नेहाचे दर्शन घडले.

यावेळी माजी उपसरपंच फारुख सय्यद म्हणाले की, “बकरी ईद हा बलिदान, त्याग आणि मानवतेचा संदेश देणारा पवित्र सण आहे. हजरत इब्राहिम यांच्या त्यागाच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो. समाजात प्रेम, आपुलकी आणि बंधुभाव वाढवण्याचे मोठे कार्य या सणातून घडते.” त्यांनी सर्वांनी एकमेकांच्या भावना समजून घेत सामाजिक ऐक्य जपण्याचे आवाहन केले.
पुढे बोलताना फारुख सय्यद म्हणाले की, “धार्मिक सण हे समाजाला एकत्र आणण्याचे माध्यम असतात. नेप्ती गावात सर्व धर्मीय नागरिक एकोप्याने आणि शांततेत सण साजरे करतात, ही गावाची परंपरा अभिमानास्पद आहे. आजच्या काळात सामाजिक सलोखा आणि परस्पर सन्मान टिकवणे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी प्रत्येकाने सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे.” त्यांनी युवकांनीही सामाजिक ऐक्य मजबूत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे मत व्यक्त केले.
बकरी ईद निमित्त गावातील विविध भागांत भेटीगाठी, शुभेच्छांचा वर्षाव आणि सामुदायिक ऐक्याचे वातावरण पाहायला मिळाले. युवकांनीही सणाचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडत सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश दिला. नाले हैदर यंग पार्टी व दोस्ती तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सणानिमित्त विविध व्यवस्था सांभाळत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.



