इतर

सावता महाराज नुसते माळी समाजाचे नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत – ओंकार महाराज बाबर

सावता महाराजांचा परमार्थ समाज मान्य, व देव मान्य होता

कोतुळ प्रतिनिधी

सावता महाराज हे नुसते माळी समाजाचे नाही तर ते संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहे त्यांचा परमार्थ समाज मान्य, व देव मान्य होता असे प्रतिपादन ह.भ.प. ओंकार महाराज बाबर यांनी केले

संत सावता महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त कोतुळ( ता. अकोले) जिल्हा अहिल्यानगर येथे संत सावता महाराज मंदिरात आयोजित कार्यक्रमात बोलत होते

ते म्हणाले की सावता महाराजांनी परमार्थातून प्रपंच केला सावता महाराजांचे परमार्थात मन रंगले होते ते 45 वर्षे आयुष्य जगले सावता महाराजांच्या रोमा रामा परमात्मा भरलेला होता सावता महाराज माणूस म्हणून नाही तर देव होऊन राहिले म्हणून सावता सागर प्रेमाचा आगर असे म्हटले जाते भगवान परमात्म्याचे नामस्मरण करा आपले कर्म भगवान परमज्ञाच्या चरणी पोहोचले पाहिजे असे कर्म करा असे आवाहन बाबर महाराज यांनी केले
यावेळी ह.भ.प.रामनाथ महाराज जाधव, विश्वनाथ महाराज शेटे,बंडू दादा मगर नितीन महाराज गोडसे,आदी सह ग्रामस्थ व भविक उपस्थित होते
संत सावता महाराज पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने दुपारी भव्य पालखी मिरवणूक सोहळा व सायंकाळी अनंत महाराज काळे यांचे काल्याचे कीर्तन झाले संत सावता महाराज मंदिरात त्रीदिनी हरीनाम सप्ताह उत्सहात पार पडला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button