इतर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर याचा कोट शिवणारे टेलर . शिंत्रे यांचे निधन

घोडेगाव दि 10
डॉ बाबासाहेब आंबेडकर याचा कोट शिवणारे टेलर कै. शांताराम लक्ष्मण शिंत्रे हे भावसार समाज, मुंबईचे ज्येष्ठ व श्रेष्ठ कार्यकर्ते तसेच समाजाचे आधारस्तंभ होते. वयाच्या ९९ व्या वर्षी, रविवार, दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी राहत्या घरी (घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे) वृद्धापकाळाने त्यांचे दुःखद निधन झाले.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कोट ते शिवत असत.असे हरहुन्नरी टेलर होते

कै. शांताराम शिंत्रे हे अत्यंत दानशूर, समाजहितैषी आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्व होते. भावसार समाज, मुंबईच्या सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले.

समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांनी शिष्यवृत्तीसाठी भरघोस देणगी दिली. तसेच गरजू समाजबांधवांसाठी वैद्यकीय मदतीसाठीही उदार हस्ते देणगी देऊन समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपली.

त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे आणि निस्वार्थ योगदानामुळे ते भावसार समाजाचे खऱ्या अर्थाने आधारस्तंभ बनले होते. त्यांचे कार्य, विचार आणि समाजासाठी त्यांनी केलेली सेवा भावी पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहील.

त्यांच्या निधनाने भावसार समाजाने एक ज्येष्ठ, अनुभवी, दानशूर व समाजहितैषी व्यक्तिमत्त्व गमावले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button