अकोले न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोक अदालत चे आयोजन

अकोले /प्रतिनिधी
जिल्हा विधी सेवा मंडळ अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका विधी सेवा समिती,अकोले तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने अकोले न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत चे आयोजन शनिवार दिनांक ७ मे रोजी करण्यात आलेआहे यावेळी ६५०० प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली असून जास्तीत जास्त जनतेने लोक अदालत मध्ये येऊन आपले प्रलंबित दावे तडजोडीने मार्गी लावावेत असे आवाहन न्यायमूर्ती सचिन खाडे यांनी केले आहे. त्या दृष्टीने अकोले विधी समिती अकोले तालुका वकील संघ यांनी अकोले येथील न्यायालयात नियोजन केले असून यावेळी अकोले न्यायालयात दिवाणी ,फौजदारी तसेच बँक पतसंस्था, वीज, बी. एस.एन.एल ,वाटपाचे दावे,खाते फोड,पोटगी, आदी ६५०० दावे पटलावर ठेवण्यात आलेले आहेत. तरी आदिवासी दुर्गम भागातील जनतेने लोक न्यायालयात येऊन आपले प्रश्न संपुष्टात आणावे.दि. ७ मे रोजी सकाळी ९ ते ५ या वेळात लोक अदालत होणार असल्याचे न्यायमुर्ती सचिन खाडे यांनी सांगितले.



