इतर

ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी करावी अमित भांगरे यांचे तहसीलदारांना निवेदन

अकोले प्रतिनिधी

अकोले तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी करावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित भांगरे यांनी अकोले तहसीलदार यांना दिले

निवेदनात म्हटले आहे की १)अतिवृष्टी झालेल्या संपूर्ण भागात सरसकट पंचनामे करण्यात यावेत.
२) शेतकरी बांधवांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी
३) ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा ४) नुकसान भरपाईची अनुदान रक्कम वाढवून मिळावी
५) शेतकरी बांधवांची सर्व कर्जाची बँक वसुली, तसेच शैक्षणिक व महसुली कर वसुली थांबवावी.
६) सर्वसामान्य जनतेला मिळणाऱ्या सर्व निराधार पेन्शनची रक्कम त्वरित मिळावी
७) शासनाने थांबवलेली रोजगार हमी योजनेची कामे पूर्ववत सुरु करावीत या अशा विविध मागण्यां चे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित दादा भांगरे यांनी मा.सिद्धार्थ मोरे तहसीलदार अकोले यांना दिले

यावेळी सुरेश गडाख,विनोद हांडे ,उमेश डावरे, विकास बंगाळ, सुरेश खांडगे, गणेश कोकणे, योगेश साबळे, दत्ता धुमाळ,सचिन गवारी, राहुल शेटे आदी सह अनेक कार्यकर्ते ऊंपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button