आजचे पंचांग व राशी भविष्य दि.०४/०१/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष १४ शके १९४७
दिनांक :- ०४/०१/२०२६,
वार :- भानुवासरे(रविवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:०३४
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:०५,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर शिशिरऋतु
मास :- पौष
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- प्रतिपदा समाप्ति १५:११,
नक्षत्र :- पुनर्वसु समाप्ति १५:११,
योग :- वैधृती समाप्ति २५:४७,
करण :- तैतिल समाप्ति २३:१०,
चंद्र राशि :- मिथुन,(०९:४३नं. कर्क)
रविराशि – नक्षत्र :- धनु – पुर्वाषाढा,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- धनु,
राशिप्रवेश :- राशीप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- वैधृती वर्ज्य दिवस,
✿राहूकाळ:- संध्या. ०४:४२ ते ०६:०५ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:४९ ते ११:१२ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ११:१२ ते १२:३४ पर्यंत,
शुभ मुहूर्त:- दुपारी ०१:५७ ते ०३:२० पर्यंत,
❀ दिन विशेष:
इष्टी, द्वितीया श्राद्ध,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष १४ शके १९४७
दिनांक = ०४/०१/२०२६
वार = भानुवासरे(रविवार)
मेष
चांगले गृहसौख्य लाभेल. मित्रमंडळींचा गोतावळा जमेल. गप्पांमध्ये दिवस मजेत जाईल. व्यावहारिक ज्ञान वापरण्याची योग्य संधी मिळेल. कामाची उत्तम पकड जमेल.
वृषभ
तुमच्या मताचा मान राखला जाईल. विरोधकांच्या कारवायांवर लक्ष ठेवा. शाब्दिक चकमक टाळा.
प्रवासात काळजी घ्यावी. उत्तम परीक्षण कराल.
मिथुन
कौटुंबिक खर्च वाढेल. आवक चांगली राहील.मौल्यवान वस्तू खरेदी कराल. अत्यंत लाघवी शब्द वापराल. आवडते पदार्थ चाखाल.
कर्क
कलेला चांगले पोषक वातावरण लाभेल. गोड बोलून सर्वांना आपलेसे कराल. मनाची चंचलता जाणवेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. पित्तविकार जाणवतील.
सिंह
इतरांवर तुमच्या वागण्याचा प्रभाव पडेल. काही गोष्टी उघडपणे बोलणे टाळावे. झोपेची तक्रार जाणवू शकते. दिवस चैनीत घालवाल. कागदपत्रे जपून ठेवावीत.
कन्या
कामाच्या बाबतीत समाधानी असाल. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. मित्रांची मदत होईल. नवीन वाहन खरेदी कराल. मनातील इच्छा पूर्ण होतील.
तूळ
व्यावसायिक लाभ चांगला होईल. सरकारी कामात लक्ष घालावे लागेल. आर्थिक जम बसेल. कलेतून चांगला फायदा संभवतो. नवीन ओळखी होतील.
वृश्चिक
तांत्रिक ज्ञान घेण्याचा प्रयत्न कराल. स्वकष्टावर भर द्यावा. कामातील दिरंगाई टाळावी. वरिष्ठांचीमर्जी राखावी. प्रवासात काळजी घ्यावी.
धनू
चिकाटी सोडून चालणार नाही. मनावरची मरगळ झटकावी लागेल. हातातील कामावर अधिक भर द्यावा. अचानक धनलाभ होईल.गैरसमज टाळावा.
मकर
जवळच्या व्यक्तीची मानसिकता जाणून घ्यावी. जोडीदाराचे हट्ट पुरवावे लागतील. प्रेमसौख्यात पुढाकार घ्यावा. भागीदारीतील जम नीट बसवावा. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे.
कुंभ
आरोग्यात सुधारणा होईल. विरोधकांवर मात कराल. कोर्टकचेरीची कामे निघतील. कौटुंबिक सौख्यात रमाल. हातातील कामे पूर्ण होतील.
मीन
हट्टीपणा सोडवा लागेल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. प्रेमसंबंध सुधारतील. तुमच्या मताला विरोध केला जावू शकतो. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर



