इतर
अकोल्यात क्रांतीकारकांचा व चळवळीचा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकांचा स्टॉल

अकोले प्रतिनिधी
भारतीय कम्युनिस्ट पक्ष ( मार्क्सवादी) अकोले च्या वतीने 9 ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिन, क्रांती दिनाच्या दिवशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने क्रांतीकारकांचा व चळवळीचा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकांचा स्टॉल अकोले शहरात लावला जाणार असल्याची माहिती कॉ. सदाशिव साबळे यांनी दिली
वृक्ष संवर्धन दिनाच्या निमित्ताने फळझाडे व इतर झाडांचे वाटप केले जाणार आहे. अकोलेच्या मातीत आदिवासी,बिगर आदिवासी, दलित अशा सर्व क्रांतीकारकांचे विचार रुजलेले आहे. त्यांचा वारसा व विचार खऱ्या अर्थांने पुढे न्यायचा असेल तर पुस्तके वाचणे गरजेचे आहे. पर्यावरणासाठी झाड लावणे झाड जगवणे गरजेचे आहे. म्हणुन आपण सर्वांनी या पुस्तकाचे स्टॉलला भेट द्यावी व पुस्तके विकत घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे



