अकोले तालुक्यात क्रांतीकारकांचे भव्य स्मारक उभारू- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यात देवगाव येथे क्रांतिकारक राघोजी भांगरे व विरगाव येथे क्रांतिकारक राया ठाकूर यांचे भव्य स्मारक उभारू यासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते ना एकनाथ शिंदे यांनी दिले
जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने अकोले जिल्हा अहिल्यानगर येथील बाजार तळावर आयोजित भव्य कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिर्डी संस्थानचे विश्वस्त डॉ. जालिंदर भोर होते
व्यासपीठावर संगमनेर चे आमदार अमोल खताळ, नेवाशा चे आमदार विठ्ठलराव लंघे, सुरेखा
गव्हाणे, कमलाकर कोते, डॉ जालिंदर भोर, शर्मिला येवले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख मारूती मेंगाळ आदी
उपस्थित होते.
आदिवासी महिला राष्ट्रपती होऊ नयेत म्हणून केलेला
विरोध हा समाज कधीच विसरू शकत नाही. जागतिक आदिवासी दिन हा आपला दिवाळी व दसरा सण आहे.
आपली विकासात्मक जडणघडण थांबविणारी कोणतीच शक्ती जगात नाही. सर्व समाजासोबत व बरोबर हा
समाज मुख्य प्रवाहात आणण्यात येईल.
आम्ही टीकेने नाहीतर विकास कामानेच उत्तर देणार. राजकारणात पदे येतात व जातात पण महाराष्ट्रातील
लाडक्या बहिणींचा हा लाडका भाऊ कायम तुमच्या बरोबर आहे. कोणी कितीही अफवा पसरवल्या तरीदेखील महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना
सुरूच राहील, आम्ही ती कधीही बंद पडू देणार नाही, हा शब्द मी आज रक्षाबंधन सणाला देतो, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
माळीण सारखे डोंगररांगेत भूस्खलन होण्याची भीती असलेल्या अकोले तालुक्यातील सोंगाळवाडीतील नागरिकांचे योग्य जागेवर पुनर्वसन करण्यात येईल, हा शब्द देतो. आदिवासी बहुल दुर्गम भागांतील राज्यभरातील प्रश्नांवर मी स्वतः लक्ष घालून
सरकारकडून सोडवण्याचे काम करेल.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आद्याक्रांतिकारक वीर राघोजी भांगरे,राया ठाकूर, बिरसा मुंडा यांना मी
अभिवादन करतो. जागतिक आदिवासी दिनानिमित्त अकोल्यात उपस्थित आदिवासी माणसांचा हा जनसागर
पाहून मी भारावून गेलो. खरा कार्यकर्ता कसा असतो ते आदिवासी युवा सम्राट मारूती मेंगाळ यांनी दाखवून दिले. अकोल्यात आदिवासींची आजमांदियाळी झाली आहे. शिवसेना हा कार्यकर्ते व सहकाऱ्यांचा पक्ष आहे.
येथे कोणीही मालक व नोकर नाही. हा मालक व नोकरांचा पक्ष नसून येथे कामात जे कोणी खोडा घालतो, त्यास बाजूला केल्याशिवाय थांबत नाही. या
प्रसंगी शाहीर मुकूंद भोर यांनी क्रांतिकारकांचा पोवाडा सादर केले.
स्वागत गणेश पापळ यांनी, प्रास्तविक बाळासाहेब भोर यांनी, तर आभार राज्य महिला युवासेनेच्या अध्यक्ष शर्मिला येवले यांनी मानले. यावेळी तालुक्यातील हजार आदिवासी बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते



