अकोल्यात उद्या ओ.बी.सी – एन.टी.समाजाची बैठक

अकोले प्रतिनिधी
ओ.बी.सी – एन.टी. समाजबांधवांच्या हक्काच्या मागण्याबाबद सुरु असलेल्या लढ्याची दिशा ठरवण्यासाठी व ओ.बी.सी – एन.टी. बांधवांवर होणाऱ्या अन्याया विरुद्ध लढण्यासाठी तमाम ओ.बी.सी – एन.टी. बांधवांची एकजूट व्हावी या उद्धेशाने तसेच आपल्या समाजातील वरिष्ठ अधिकारी व गुणवंतांचा सन्मान करण्यासाठी अकोले तालुक्यात लवकरच भव्य मेळावा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे
या कार्यक्रमाच्या नियोजना साठी अकोले तालुक्यातील ओ.बी.सी. एन.टी. समाज बांधवांची नियोजन बैठक मंगळवार, दि. 19/08/2025 रोजी सकाळी ठीक 11.00 वा.- माहेश्वेरी मंगल कार्यालय (अकोले नगरपंचायत कार्या. शेजारी) येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे,
तरी अकोले तालुक्यातील तमाम ओबीसी एनटी समाज बांधवांनी या बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ओ.बी.सी – एन.टी. मेळावा नियोजन समिती ने केले आहे
——–



