फळबाग लागवडी साठी पेंडशेत येथे शेतकरी प्रशिक्षण

अकोले प्रतिनिधी
समृद्ध किसान प्रकल्प मार्फत अकोले तालुक्यातील पेंडशेत येथे फळबाग लागवडी साठी आंबा(केशर), पेरू(रेड डायमंड) रोपे देण्यात आली. तसेच शेतकरी प्रशिक्षण देण्यात आले
त्यामध्ये लागवड करणे, झाडाना आधार देणे, भर देणे, पावसाचे प्रमाण अधिक असल्याने रोपांची मर होऊ नये, याविषयी सविस्तर माहिती दिली तसेच प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.
या प्रशिक्षण साठी चे नियोजन ए.एस.के. फाऊंडेशन मुंबईचे सहाय्यक उपाध्यक्ष श्री. सिद्धार्थ आयर व प्रकल्प व्यवस्थापक श्री. अरुण बांबळे, बायफ संस्थेचे वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक श्री. सुरेश सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बायफ चे श्री. विष्णू चोखंडे, श्री. राम कोतवाल, श्री. सौरभ खाडे यांनी केले. तसेच ग्रामविकास समिती चे अध्यक्ष, सचिव, सदस्य, सरपंच सोमनाथ पदमेरे, परशुराम पदमेरे, काशीनाथ खाडे उपस्थित होते.

————



