इतर
रुंभोडी येथील कम्युनिस्ट कार्यकर्ते निवृत्ती अण्णा सावंत यांचे निधन

रुंभोडी प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील रुंभोडी येथील कम्युनिस्ट चळवळीतील कार्यकर्ते विडी कामगार निवृत्ती अण्णा सावंत उर्फ आबा (वय 86वर्षे) यांचे मंगळवारी निधन झाले
ते अतिशय धार्मिक वृत्तीचे व मनमिळाऊ स्वभावाचे त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, सुना, नातू,पुतणे असा परिवार आहे
गावातील धार्मिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता गावातील ग्रामदैवत हनुमान मंदिराच्या विकासासाठी ते प्रयत्नशील होते सौ उषाताई घुले, सौ संगीताताई डावरे,स्वर्गीय चंद्रकांत सावंत,श्री दत्ता सावंत यांचे वडील होते त्यांच्या निधनाने परिसरात दुःख व्यक्त होत आहे




