आजचे पंचांग व राशी भविष्य दि.१२/११/२०२५

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक २१ शके १९४७
दिनांक :- १२/११/२०२५,
वार :- सौम्यवासरे(बुधवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:३५,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०५:५१,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर हेमंतऋतु
मास :- कार्तिक
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- अष्टमी समाप्ति २२:५९,
नक्षत्र :- आश्लेषा समाप्ति १८:३६,
योग :- शुक्ल समाप्ति ०८:०२,
करण :- बालव समाप्ति १०:५८,
चंद्र राशि :- कर्क,(१८:३६नं. सिंह),
रविराशि – नक्षत्र :- तुला – विशाखा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी १२:१३ ते ०१:३८ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०६:३५ ते ०७:५९ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०७:५९ ते ०९:२४ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी १०:४९ ते १२:१३ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०४:२७ ते ०५:५१ पर्यंत,
❀ दिन विशेष:
कालाष्टमी, कालभैरव जयंती,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक २० शके १९४७
दिनांक = ११/११/२०२५
वार = भौमवासरे(मंगळवार)
मेष
चांगुलपणाने लोकांना आपलेसे कराल. स्वभावातून परोपकारी भावना व्यक्त कराल. कामातील बदल हिताचा ठरेल. केवळ आपल्या कामावर लक्ष केन्द्रित करावे. दिवसाचा उत्तरार्ध चांगला .
वृषभ
आपली मानसिकता जपावी. आजचा दिवस शुभ असेल. कुटुंबासोबत संस्मरणीय वेळ घालवाल. दुपार नंतर चांगली बातमी मिळेल. पाहुणे मंडळी भेटतील.
मिथुन
आपल्या मनोकामना पूर्ण होतील. वडीलधार्या मंडळींचे शुभाशिर्वाद मिळतील. मात्र दिवस काहीसा व्यस्त राहील. नवीन योजना आमलात आणण्याचा प्रयत्न करावा. मन प्रसन्न राहील.
कर्क
घरातील वातावरण चांगले राहील. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. कोष वृद्धीचे संकेत. व्यावसायिक योजनांना गती मिळेल. भावनिक निर्णय टाळा.
सिंह
आपल्या बोलण्याने लोकांचे समाधान होईल. एखादी महत्त्वाची इच्छा पूर्ण होऊ शकेल. मुलांच्या जबाबदार्या पार पाडाल. अपचनाचे त्रास संभवतात. आरोग्याची काळजी घ्यावी.
कन्या
घरात मोठ्या वस्तूंची खरेदी कराल. कामाचा व्याप वाढता राहील. कौटुंबिक वातावरण सुखकर असेल. आपल्या कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. कामाचा खोळंबा होणार नाही याची काळजी घ्या.
तूळ
समाधानकारक आनंदी वार्ता समजतील. उत्तमोत्तम संधी मिळू शकतील. शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस. मिळकतीचे नवीन स्त्रोत सापडतील. मोसमी आजार त्रस्त करू शकतात.
वृश्चिक
अडून राहिलेली कामे पूर्ण होतील. आपल्या मनाप्रमाणे काम पूर्ण करता येईल. बोलताना तारतम्य बाळगवे. विनाकारण डोकेदुखी वाढू शकते. रागावर नियंत्रण ठेवावे.
धनू
मानसिक समाधान लाभेल. आजचा दिवस खास असेल. भौतिक सुखात वाढ होईल. नोकरदार वर्गाला दिलासा मिळेल. काही क्षुल्लक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
मकर
धार्मिक कामासाठी पैसे खर्च कराल. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस. मन प्रसन्न राहील. कौटुंबिक जबाबदार्या उत्तमरीत्या पार पाडाल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.
कुंभ
दिवस मजेत घालवाल. मिळकत आणि खर्च यांची सांगड घालावी. झेपेल इतकेच काम अंगावर घ्यावे. खरेदी-विक्रीच्या व्यवहारात चोख राहावे. मानसिक प्रसन्नता जपावी.
मीन
मनातील दूषित गोष्टींना हद्दपार करा. आपल्याच मतावर अडून राहू नका. छोटे प्रवास संभवतात. व्यवसाय वाढीमुळे समाधान लाभेल. वैवाहिक जीवन सुखमय होईल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर
