मवेशी शैक्षणिक संकुल येथे प्रकल्पस्तरीय आश्रमशाळा क्रीडा स्पर्धांचे आयोजन..!

अकोले प्रतिनिधी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजुर अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या 21शासकीय व 17 अनुदानित आश्रम शाळेतील केंद्रस्तरीय स्पर्धेतून निवड झालेल्या 489 मुले तर 534 मुली असा एकुण 1023 आश्रम शाळा विद्यार्थ्यांच्या प्रकल्पस्तरीय क्रीडास्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रकल्प स्तरीय क्रीडासमितीच्या अध्यक्ष तथा राजुर प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी श्रीम.देवकन्या बोकडे यांनी दिली.
शैक्षणिक संकुल मवेशी ता. अकोले येथे दि.25 ते 27 नोव्हेंबर अखेर संपन्न होणाऱ्या क्रीडास्पर्धेत कबड्डी,खो-खो,हाॅलीबाॅल, हॅन्डबाॅल,तसेच वयक्तीक क्रीडाप्रकारात लांबउडी, उंचउडी,धावणे,चालणे,गोळाफेक,भालाफेक, थाळीफेक या क्रीडाप्रकारात वय वर्ष 14,17 व 19 वर्ष वयोगटात सदर स्पर्धा संपन्न होणार असुन सदर प्रकल्प स्तरीय क्रीडास्पर्धा यशस्वीतेसाठी क्रीडासमिती, स्वागतसमिती, आरोग्यसमितीसह विविध प्रकारच्या समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या क्रीडास्पर्धेबरोबरच आश्रमशाळा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारणे व गुणवत्तापूर्ण शिक्षण विकासासाठी आश्रमशाळा शिक्षकांसाठी प्रकल्प स्तरीय शैक्षणिक साहित्य निर्मिती व कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.विद्यार्थी गट,प्राथमिक व माध्यमिक शिक्षक या गटात सदर शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा प्रदर्शन आयोजित केले असुन यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान केला जाणार आहे.
दि.25 नोव्हेंबर रोजी उदघाटन तर दि. 27 नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या बक्षिस वितरण समारंभासाठी आदिवासी विकास विभागाचे विविध मान्यवर ऊपस्थित रहाणार असुन सदर क्रीडाउत्सवासाठी अकोले तालुक्यातील क्रीडाप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रकल्पस्तरीय क्रीडासमिती सदस्य सर्वश्री सहा.प्रकल्प अधिकारी मनोजकुमार पैठणकर (प्रशासन),तुषार पवार,(योजना) दिपक कालेकर, आंबादास बागुल (शिक्षण),लेखाधिकारी संजय सोनवणे,कार्यालय अधीक्षक सुनिल मोरे,शाम कांबळे,आदि.विकास निरीक्षक कमलाकर हंडीबाग,अनिल जोशी,कुलदीप पाटील व गंगाराम करवर यांनी केले असुन स्पर्धा यशस्वीतेसाठी विविध क्रीडासमित्या स्थापन करण्यात आल्या आहेत या क्रीडा स्पर्धा यशस्वीतेसाठी अहिल्यानगर जिल्ह्य़ातील अडुतीस शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक याच्यासह विविध आश्रम शाळेंचे मुख्याध्यापक व क्रीडा मार्गदर्शक प्रयत्नशील आहेत.



