नेप्तीत वेताळबाबा मित्र मंडळाच्या क्रिडा स्पर्धा उत्साहात,

अहिल्यानगर : प्रतिनिधी
नगर तालुक्यातील नेप्ती येथील श्री संत सावता महाराज मंदिर प्रांगणात वेताळबाबा मित्र मंडळ व द किंग ग्रुप, नेप्ती यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य क्रीडा स्पर्धा उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या.
२१ ते २३ सप्टेंबरदरम्यान तीन दिवस झालेल्या या स्पर्धांमध्ये नेप्ती व परिसरातील लहान मुले, महिला, पुरुष, युवक-युवती अशा ३०० हून अधिक स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यामुळे संपूर्ण नेप्ती गावात गणेशोत्सवाच्या निमित्ताने सणासुदीचे वातावरण निर्माण झाले होते
या स्पर्धांचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष शाहूराजे होले यांच्या हस्ते करण्यात आले होते. दररोज सायंकाळी सात वाजता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी लिंबू-चमचा व तळ्यात-मळ्यात या मनोरंजक स्पर्धांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. लिंबू-चमचा स्पर्धेत महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. समतोल राखत लिंबू चमच्यातून घेऊन जाण्याच्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर झालेल्या तळ्यात-मळ्यात स्पर्धेत युवकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
दुसऱ्या दिवशी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत २३ हून अधिक महिला व युवतींनी सहभाग घेतला. गणपती, फुलांची रांगोळी, निसर्गचित्रे अशा विविध विषयांवर आकर्षक रांगोळ्या साकारण्यात आल्या. सुमारे तीन तास रंगलेल्या या स्पर्धेत महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले.
अंतिम दिवशी संगीत खुर्ची व ग्लास बॅलन्सिंग रेस या स्पर्धा घेण्यात आल्या. संगीत खुर्चीमध्ये लहान मुले , युवकांनी व महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. विजेत्यांची घोषणा होताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांचे अभिनंदन केले. ग्लास बॅलन्सिंग रेसमध्ये डोक्यावर पाण्याने भरलेला ग्लास ठेवून तो न सांडता धावण्याचे आव्हान स्पर्धकांसमोर होते. या स्पर्धेलाही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रत्येक स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी व आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. संगीत खुर्ची वयोगट १२ ते १८
महिला संगीत खुर्चीमध्ये श्रद्धा शहाणे, शारदा शहाणे व अर्चना राऊत यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. पुरुष संगीत खुर्चीमध्ये सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, संभा गवळी व ओंकार भुजबळ यांचा विजेत्यांमध्ये समावेश आहे. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना ट्रॉफी व बक्षीसे देण्यात आली.
यावेळी माजी सरपंच अंबादास पुंड, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ पुंड ,समता परिषदेचे तालुका अध्यक्ष रामदास फुले, शाखाध्यक्ष शाहूराजे , प्राध्यापक भाऊसाहेब पुंड, ओंकार भुजबळ ,सौरभ भुजबळ, तुषार भुजबळ, सीए तन्मय पुंड, तेजस नेमाने, कुणाल शिंदे, सागर शिंदे, नितीन शिंदे, सार्थक होले, आदित्य पुंड, सिद्धार्थ शिंदे, प्रशांत रावळे, संकेत कर्पे, हर्षल चौरे, विनायक बेल्हेकर, मिलिंद होले, सार्थक सप्रे, शिवम सप्रे, साईराज सप्रे, प्रणव होळकर, सचिन दरेकर,
अॅड अमित दरेकर,
, समर्थ जवणे, , संग्राम कदम, आर्यन टाक, कृष्णा शेरकर, मंथन पुंड, आयुष्य राऊत, राज बेल्हेकर, ओम राऊत, साई राऊत, गणेश होले , शोभा होले, स्वप्नाली होले, अर्चना राऊत, पुनम राऊत, जयश्री भुजबळ, श्रद्धा शहाणे, शारदा शहाणे, आरती शिंदे , जयश्री होले, सुनंदा होले, रूपाली कावरे, महिला ग्रामस्थ , वेताळ बाबा मित्र मंडळ व द किंग ग्रुप चे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धांमुळे मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक रोषणाईने उजळून निघाला होता. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे नेप्ती परिसरातील नागरिकांना क्रीडा, मनोरंजन आणि सामाजिक एकोप्याचा सुंदर अनुभव मिळाला.


