करियर अकॅडमी काळाची गरज.– पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे

सनराइज् ॲकॅडमी येथे कम्बाईन परीक्षेच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार
पारनेर दि.९ पारनेर प्रतिनिधी
भरतीपूर्व पोलीस, सैनिक दल, नेव्ही यासारख्या सैनिक दलात भरती होण्यासाठी आजकालच्या काळात करिअर अकॅडमी सारख्या अनुभवी प्रशिक्षकाची गरज असल्याची प्रतिक्रिया पारनेर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे यांनी दिली. ते पारनेर शहरातील सनराइज् करिअर अकॅडमी यांनी आयोजित केलेल्या एम पी एस सी मार्फत होणारी कम्बाईन परीक्षा २०२४ उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र करंदीकर, सनराईज करिअर अकॅडमीचे संचालक सुनील चौधरी ( सर) आदी मान्यवर उपस्थित होते.
खंडागळे यांनी भरतीपूर्व प्रशिक्षित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजकाल प्रत्येक क्षेत्रात कॉम्पिटेशन वाढली आहे.विद्यार्थ्यांनी जनरल नॉलेजची पुस्तके वाचून आकलन शक्ती वाढवली पाहिजे. स्वतःचे करियर बनवण्यासाठी भविष्यातील ध्येय निश्चित केले पाहिजे.
यावेळी स्वतःचा शालेय अनुभव सांगताना बोलले की, जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा आमच्या शाळेत एक पोलीस अधिकारी मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. पोलीस अधिकारी यांचे विचार ऐकून आणि त्यांचा खाकी ड्रेस पाहून माझ्या मनात तेव्हाच आले होते की मी सुद्धा एक दिवस या पदापर्यंत पोहचेल. त्या दृष्टीने मी जिद्द, चिकाटी आणि ध्येय यांचा विचार करून आज पोलीस अधिकारी पदापर्यंत पोहचलो आहे. आपणा सर्व विद्यार्थ्यांमध्ये काही तरी करण्याची आशा दिसून येत आहे. जास्तीत जास्त जनरल नॉलेजची पुस्तके वाचून आणि त्या दृष्टीने जीवाचे रान करून तसेच आई वडील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यशस्वी व्हाल अशी शुभेच्छा दिली.
सूत्रसंचालन राजेंद्र करंदीकर यांनी केले तर आभार निलेश गायकवाड यांनी मानले.



