इतर

जीविधा प्रकल्पांतर्गत कोदणी येथे रब्बी पीक शेतकरी प्रशिक्षण संपन्न”

एस के जाधव
कोकणवाडी ता अकोले, दि. ४ – अकोले तालुक्यातील कोदणी येथे जीविधा प्रकल्पांतर्गत रब्बी हंगामातील पिक लागवड तयारी आणि पूर्वनियोजनासाठी शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. आलेईमा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांच्या अर्थसहाय्याने व बायफ लाईव्हलीहूड्स महाराष्ट्र यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या जीविधा प्रकल्पांतर्गत हे प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणात कोदणी गावातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
या प्रशिक्षणामध्ये रब्बी हंगामातील प्रमुख पिकांची निवड, लागवड पद्धती , कडधान्य पिकांची बीज प्रक्रिया, खरीप हंगामानंतरच्या बियाण्याची निवड व साठवणूक, काढणीनंतरच्या पिक व्यवस्थापनाच्या पद्धती, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन यावर सह जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री. योगेश नवले यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच पाणी व्यवस्थापन, जमीन निवड पूर्व तयारी , रोग व किडींची ओळख, त्यांचे जैविक नियंत्रण उपाय, शाश्वत शेती पद्धतींचे महत्त्व व पर्यावरणपूरक शेतीच्या तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री. किरण आव्हाड यांनी प्रत्यक्ष उदाहरणांसह माहिती दिली.


शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत मशागत पद्धती, पीक फेरपालटाचे फायदे, मातीतील सेंद्रिय पदार्थाचे संवर्धन, कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्याच्या तंत्रज्ञानाचे उपयोग याबाबतही सविस्तर मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणाचे नियोजन बायफचे मुख्य तांत्रिक कार्यकारी अधिकारी श्री. संजय पाटील, बायफ नाशिक झोनचे मुख्य कार्यक्रम व्यवस्थापक श्री. प्रदीप खोसे आणि वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक श्री. सुरेश सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली जीविधा प्रकल्प समन्वयक श्री. योगेश नवले यांनी केले होते. हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी श्री. राम भांगरे, श्री. आनंदा गोलवड, श्री. किसन बांबेरे, श्री. बाळू बांबेरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button