शिक्षण व आरोग्य

खेळ व दर्जेदार शिक्षणातुन आश्रमशाळा विद्यार्थ्यांचा विकास साधावा..! -अपर आयुक्त दिनकर पावरा

अकोले- प्रतिनिधी

शैक्षणिक संकुल मवेशी ता.अकोले येथे दि.25/11/2025 ते 27/11/2025 अखेर प्रकल्पस्तरीय क्रीडास्पर्धा संपन्न झाल्या दि 27/11/2025 रोजीसायंकाळी 4 वाजता प्रकल्पस्तरीय क्रीडास्पर्धा व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला या बक्षिस वितरण सोहळ्या प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात आदिवासी विकास अपर आयुक्त महा.राज्य नाशिक श्री.दिनकर पावरा यांनी वरील उदगार काढले.
बक्षिस वितरण कार्यक्रमाला जिल्हा क्रीडा अधिकारी
ज्ञानेश्वर खुरंगे,आमदार किरण लहामटे,सामाजिक कार्यकर्ते कविराज भांगरे,कैलास नवले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


आपल्या भाषणात श्री.दिनकर पावरा, पुढे म्हणाले की,शाळा व मैदान हा आदिवासी विकास विभागाचा या वर्षाचा मानस आहे.महाराष्ट्रातील नाशिक आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळा मुलांसाठी क्रीडाप्रबोधनीमध्ये प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा व क्रीडा नैपुण्य वाढवावे.आता
राष्ट्रीय स्तरावरचे प्रावीण्य मिळवलेले क्रीडा शिक्षक पुढील महिन्यात सर्व शाळेसाठी नाशिक विभागात नियुक्त करत आहोत.त्यामुळे मुलांनी शिक्षण व खेळ याचा समन्वय साधावा.तसेच कला प्रदर्शन व विज्ञान प्रदर्शन शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी ज्या ज्या शाळेने चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन केलं त्यांचे कौतुक करून जे विद्यार्थी विभागीय स्तरासाठी पात्र ठरले आहेत त्यांना श्री.पावरा यांनी शुभेच्छा दिल्या व विभागीय क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांकडून सराव करून घ्यावा असे आवाहनही शेवटी श्री.पावरा यांनी आपल्या भाषणात केले.


कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार डाॅ. श्री.किरण लहामटे आपल्या भाषणात म्हणाले की,आपल्या क्रांतिकाराकांनी या देशासाठी मोठं बलिदान दिले प्राणांची आहुती दिली आहे. भारतामध्ये जेवढे काही लोकं मुलनिवासी आहेत.ते कधीच हा देश सोडून जाणार नाही. या मातीवरती जन्माला आले आणि शेवटपर्यंत इथेच राहणार. त्यामुळं जात म्हणून न वागता माणुस हिच जात व मानवता हाच धर्म हा विचार अंगिकारावा. तसेच भारत देश हा महाशक्ती व्हावा असं जर वाटत असेल तर भारत देश हा मूळात खेड्यापाड्यांमध्ये वसलेला देश आहे. आज व्यापारामुळे सत्तर टक्के लोकं शहरांमध्ये स्थलांतरीत आहेत परंतु जोपर्यंत ग्रामीण भाग समृद्ध होत नाही, ग्रामीण भाग पुढं जात नाही तोपर्यंत भारत महाशक्ती होऊ शकत नाही. व त्यासाठी शिक्षण हे शस्त्र बाबासाहेबांनी दिलय. मुलांनो मध्येच शिक्षण सोडायचं नाही. कमी वयात लग्न करायचं नाही. खूप मोठे व्हा. त्यामुळे आयुष्यात तुम्ही सगळं कमवलं पण जर शरीर संपन्न नसेल तर काय उपयोग.सध्या मोबाईलचा व इंटरनेटचा जमाना आहे.परंतु शाळेतील क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून आपल्याला खेळ किती महत्वाचे आहेत हे शिकवले जाते. खेळातुन सांघिक व्यक्तीमत्व घडवलं जात आहे.त्यामुळे तुम्ही तंदुरुस्त राहुन चांगले खेळाडू कसे होऊ याचा प्रयत्न करावा. उद्या हे देशासाठी मोठं योगदान ठरणार आहे. देशाचे संरक्षण व चांगले अधिकारी बनावे आशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
मवेशी येथील सेंट्रल किचन चालू करून. मुलांना चांगलं भोजन भेटेल यासाठी प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांना
क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य आणि अभ्यासात प्रगतीसाठी दर्जेदार शिक्षण व शिक्षक हवे आहेत.आश्रम शाळेची गुणवत्ता तपासणीसाठी बाहेरच्या जगाबरोबर आमची पोरं चालतायेत का? मुलांना त्या दर्जाचं शिक्षण भेटतंय की नाही? मुलांच्या आरोग्याची तपासणी होतेय की नाही? हे पहाणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन करून विभाग स्तरावर निवड झालेले खेळाडुंचे अभिनंदन डाॅ लहामटे यांनी केले.


पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.दिनकर पावरा अपर आयुक्त नाशिक हे होते.कार्यक्रमात प्रमुख आतिथींच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमापूजनाने पारितोषिक वितरण कार्यक्रमाची सुरूवात झाली.तर राजुर प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती.देवकन्या बोकडे यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व स्पर्धा आयोजना मागील उद्देश विशद केला.


कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.ज्ञानेश्वर खुरंगे आपल्या प्रमुख भाषणात म्हणाले की,प्रत्येक खेळाडूने जर आवडीचा छंद जोपासला सातत्याने सराव केला तर त्या माध्यमातून करियर करण्याची एक नवीन संधी आपल्याला उपलब्ध होणार आहे. जे खेळाडू आपले राज्यस्तरावरील स्पर्धेमध्ये सहभागी होतात पदक मिळवतात असा खेळाडूंसाठी महाराष्ट्र शासनाने 5% जागा शासकीय आणि निमशासकीय सेवेत ठेवलेल्या आहेत. या 5% आरक्षणाचा फायदा घेऊन कित्येक विद्यार्थी आज पोलीस प्रशासन असेल किंवा शासनाच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये वर्ग तीन पदावरती काम करत आहेत. आपण सर्व खेळाडूंनी विशिष्ट उंचीपर्यंत पोहोचायचं असेल तर खेळाचा सातत्याने सराव केला पाहिजे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये जन्मताच ज्या खेळामध्ये गुणवत्ता लागतात त्या सगळ्या गुणवत्ता आहेत. खेळासाठी

आपल्याला ऍक्शन, स्ट्रेंथ, लागणारं स्पीड, दमदारपणा, लवचिकता, ऍजिलीटी, सांघिकता ज्याच्यामध्ये असतो तो उत्तम खेळाडू होऊ शकतो. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या खेळ प्रकाराचा सातत्याने सराव केला पाहिजे.
शालेय क्रीडा स्पर्धेमधुन राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचता येऊ शकतं म्हणून आपल्या आदिवासी भागामध्ये कित्येक खेळाडू आहेत की त्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील चांगल्या प्रकारचं यश संपादन केलेलं आहे.शासनाच्या माध्यमातून खेळासाठी सतत प्रोत्साहन दिले आहे.या भागातील प्रत्येक युवकांनी सुदृढ राहावं, सशक्त राहावं म्हणून अकोले तालुक्यात जास्तीत जास्त खेळाचं साहित्य गावातल्या युवकांपर्यंत कसं पोहोचेल यासाठी

क्रीडाविभागाचे प्रयत्न चालू आहेत. अकोले तालुक्यात तालुका क्रीडा संकुलाची जागा लवकरच आपल्याला मिळणार आहे.व तालुक्यातीलआदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज असं क्रीडा संकुल काही दिवसात अकोले येथे साकार झालेलं आपणास दिसणार आहे.स्विमिंगमध्ये तेवीस सुवर्ण पदक विजेता अमेरिकेचं मायकल फेल्प्स या जलतरण पटूच उदाहरण श्री. खुरंगे यांनी दिले व कठीण परिश्रम हा यशाचा एकमेव मार्ग आहे आणि
खेळाच्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. मैदानावर झालेला पराभव हा जीवनामध्ये देखील आपल्याला अनेक क्षेत्रांमध्ये अपयश पचवायचा धडा आहे.आपण स्पर्धेच्या माध्यमातून मिळालेला विजय असेल तर तो देखील संयमाने कशा पद्धतीने पचवायचा हे देखील आपल्याला खेळ शिकवतो. त्यामुळे संयम ठेवणं आवश्यक आहे. खेळात हार आणि जीत हा खेळाचा एक भाग आहे परंतु खेळामध्ये सहभाग घेतला हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असल्याचे प्रतिपादन श्री.खुरंगे यांनी शेवटी केले.


मवेशी संकुल येथे संपन्न झालेल्या क्रीडास्पर्धेत कबड्डी,खो-खो,हाॅलीबाॅल,हॅन्डबाॅल,तसेच वैयक्तीक क्रीडाप्रकारात लांबउडी, उंचउडी, धावणे,गोळाफेक,भालाफेक, थाळीफेक या क्रीडाप्रकारात वय वर्ष 14,17 व 19 वर्ष वयोगटात सदर स्पर्धा संपन्न झाल्या असुन सदर स्पर्धेत 489 मुले तर 543 असे एकूण 1023 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रकल्प स्तरीय क्रीडास्पर्धाबरोबरच आश्रमशाळा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारणे व गुणवत्तापूर्ण शिक्षण विकासासाठी आश्रमशाळा प्राथमिक, माध्यमिक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती व कला प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.याचेही बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.विज्ञान प्रदर्शनात 36 शाळेतील 114 व विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला तर कला प्रदर्शनात 23 शाळेतील 87 विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला. कला व विज्ञान प्रदर्शन समिती प्रमुख मुख्याध्यापक श्री.आदिनाथ सुतार व पंडीत कदम यांनी उत्कृष्ट आयोजन केले.क्रीडा
स्पर्धा यशस्वीतेसाठी क्रीडासमितीसह विविध
प्रकाराच्या शिक्षकांच्या समित्या गठीत करण्यात आल्या होत्या.


पारितोषिक वितरण कार्यक्रमास सहा.प्रकल्प अधिकारी श्री. मनोजकुमार पैठणकर, दिपक कालेकर ,सुनील मोरे,
संजय सोनवणे,शाम कांबळे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.शिवराज कदम,उपाध्यक्ष आदिनाथ सुतार,कमलाकर हंडीबाग, संशोधन अधिकारी श्री.शंतनु डांगे,गंगाराम करवर,कुलदिप पाटिल, विकास साळवे,श्री.पंडीत कदम,सलिम शेख, श्री.बाळासाहेब शिरसाठ, शिवाजी नरके,मेजर बांबळे, शरद विटेकर,चंदन बडवे,लिना पटनाईक, सविता नागरगोजे,शिरोळे सर,पावडे सर,किशोरशिंदे,शिवनाथ खेडकर, टकले सर, यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
या वेळी भरती पुर्व प्रशिक्षण केंद्रांच्या विद्यार्थीनीनी आकर्षक संचलन करून प्रमुख आतिथींना मानवंदना दिली.
शासकीय आश्रम शाळा अकलापुर केंद्राला या वर्षी जनरल चॅम्पियन्सशिप मान्वराच्या हस्ते प्रदान करण्यात आली,तर प्रकल्पस्तरीय स्पर्धेतील विजेत्यांना सांघिक व वैयक्तीक क्रीडाप्रकाराचे विविध गटातील बक्षिस वितरण करण्यात आले.

प्रकल्पस्तरीय क्रीडास्पर्धा दि.25 ते 27 नोव्हेंबर अखेर मवेशी संकुल येथे संपन्न झाल्या असून या क्रीडास्पर्धेत राजुर प्रकल्पातील 38 शासकीय व निमशासकीय शाळेतील 1023 विद्यार्थ्यांनी आपले क्रीडानैपुण्य दाखवले आहे. उत्कुष्ठ स्पर्धा आयोजनाबाबत. अपर आयुक्त श्री.दिनकर पावरा यांनी समाधान व्यक्त करून प्रकल्प अधिकारी व सर्व शिक्षकांना धन्यवाद दिले.
कार्यक्रमात मुख्याध्यापक संघाने मान्यवरांचा सत्कार केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.नवनाथ गायकवाड,मुकुंद सुर्यवंशी यांनी केले होते तर मान्यवरांचे आभारश्री.दिपक कालेकर सहा.प्रकल्प अधिकारी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button