इतर

जोर्वे येथील यशदीप दिघे यांची भारतीय सैन्यात लेफ्टनंटपदी निवड.

संगमनेर ( प्रतिनिधी ) जोर्वे येथील सेवानिवृत्त सैनिक राजेंद्र रावसाहेब दिघे यांचे चिरंजीव यशदीप उर्फ सनी राजेंद्र दिघे हे देहरादून येथून एनडीएचे प्रशिक्षण पूर्ण करून देशसेवेसाठी लेह लडाख  येथे लेफ्टनंट पदावर आर्मीमध्ये कार्यरत होणार आहेत.

जोर्वे येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले राजेंद्र दिघे यांनी भारतीय सैन्यामध्ये 27 वर्ष सेवा दिली. ज्या दिवशी ते निवृत्त झाले त्याच दिवशी त्यांचा मुलगा यशदीप याची एनडीए मध्ये निवड झाली. हा मोठा योगायोग होता यशदीपने पुणे येथील खडकवासला येथे तीन वर्षाचे ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर एक वर्ष देहरादून येथे आपले प्रशिक्षण पूर्ण केले.

भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी जी मुरमु व विविध केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री यांच्या देहरादूनच्या एनडीए अकॅडमीमध्ये उपस्थितीमध्ये एनडीएचा पदग्रहण समारंभ मोठ्या शानदार पद्धतीने संपन्न झाला.

यावेळी यशदीप चे वडील मेजर राजेंद्र दिघे ,आई सौ.पूजा दिघे, व प्रांजल दिघे यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते. लहानपणापासूनच भारतीय सैन्यातून देशसेवा करण्याचे आपले स्वप्न होते. ते पूर्ण झाले असल्याची भावना यावेळी लेफ्टनंट यशदीप दिघे यांनी व्यक्त केली. ते लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे जनसंपर्क अधिकारी नामदेव कहांडळ यांचे भाचे आहेत.

लेफ्टनंट यशदीप दिघे यांच्या यशाबद्दल महाराष्ट्राचे मा. महसूल व कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आ. डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ दुर्गाताई तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात, डॉ.जयश्रीताई थोरात, शरद नाना थोरात, पुंजाहरी दिघे, सुरेश थोरात, शेती संघाचे मॅनेजर अनिल थोरात, रावसाहेब दिघे,अर्जुन दिघे, सर्जेराव दिघे, प्रभाकर रामकर, सोमनाथ रामकर ,गणेश कहांडळ, सुनील थोरात, सतीश कहांडळ ,राजेंद्र कहांडळ, संजय खैरनार यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button