विद्यार्थ्यांनी केवळ मार्कांची नाही तर ज्ञानाची साधना करावी – संदीप वाकचौरे

अकोले प्रतिनिधी-
विद्यार्थ्यांनी ज्ञानाची साधना करावी मार्कांची नाही असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ, व्याख्याते व जेष्ठ पत्रकार संदीप वाकचौरे यांनी केले.ते आनंदगड पॉलीटेक्निक कॉलेज येथे सुरू असलेल्या मार्गदर्शन कार्यशाळेत बदलत्या शिक्षणापुढील आव्हाने या विषयावर बोलत होते.
आंतरभारती रुलर इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट संचलित आनंदगड पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ प्रथम वर्ष नूतन प्रवेशित विद्यार्थी स्वागत समारंभ व त्याचे औचित्य साधून आयोजित क्रीडा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, तज्ज्ञ मार्गदर्शन कार्यशाळा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पॉलिटेक्निक कॉलेजचे समन्वयक विद्याचंद्र सातपुते हे होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, सचिव डॉ .अनिल रहाणे,प्राचार्य विनोद गिरी, कॅम्पस डायरेक्टर प्रा.संदीप थोरात यांसह मान्यवर उपस्थित होते.
पुढे मार्गदर्शन करताना श्री .संदीप वाकचौरे म्हणाले की ,पदवी बरोबर ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. शिक्षणासमोरील आव्हाने लक्षात घेणे गरजेचे आहे.
स्वभाषेतून शिक्षणाला प्राधान्य दिले जायला आहे. संशोधन करणे ,मोबाईल वरील माहितीची सत्यता तपासणे ,विद्यार्थ्यांना माणूस बनवणे ,प्रमाणिकपणा जपणे मुलांना मोठी स्वप्न पाहायला लावणे व पूर्तीसाठी प्रयत्न करावयाचे प्रेरणा निर्माण करणे, इतिहास समजून घेणे माहितीची उपासना करणे ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करणे
मार्क मिळवण्यापेक्षा पदवीसाठी आवश्यक असलेले कौशल्य आत्मसात करणे ही सगळ्यात मोठे शिक्षणासमोरील आव्हाने असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले . आपल्या हाती माहिती आणि तंत्रज्ञाने मोठ्या प्रमाणावर माहिती दिली आहे, पण त्या माहितीच्या पलीकडे विवेकशीलता आणि शहाणपण या वाटेने चालण्यासाठी शिक्षणातून प्रयत्न होण्याची गरज आहे. विद्यापीठांनी पदवी दिली म्हणजे आपण ज्ञानी झालो असे घडत नाही .यासाठी साधना अखंड जीवनभर करावी लागते .त्या साधनेतूनच आपल्याला एखाद्या विषयामध्ये तज्ज्ञता निर्माण करता येते.त्यामुळे जीवनभर ज्ञान साधनेची वाट निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न पदवी आणि शिक्षणातून होण्याची गरज आहे.
प्रसंगी यशवंतराव चव्हाण डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम आईन्स्टाईन यासारख्या थोर विचारवंतांची उदाहरणे देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्न स्वप्नपूर्तीसाठी अतोनात प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना को- ऑर्डिनेटर विद्याचंद्र सातपुते यांनी विद्यार्थ्यांनी जीवनात कौशल्य प्राप्त करावी.कौशल्ये असतील तर नोकऱ्या तुमच्या मागे फिरतील अशा शब्दात विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले
सूत्रसंचालन विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी आंबरे व ज्ञानेश्वरी गोर्डे यांनी केले प्रास्ताविक प्राचार्य विनोद गिरी यांनी तर आभार प्रा. संदीप थोरात यांनी करतांना सर्व मार्गदर्शनाचा आढावा घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक व कर्मचारी विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.



