काटकसरीच्या कारभाराने अमृतसागर दूध संघाची प्रगती कडे वाटचाल – चेअरमन वैभवराव पिचड

अमृतसागर दूध संघाची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कामगिरी चा अभिनंदना चा ठराव
अकोले प्रतिनिधी–
अमृतसागर दूध संघाचा कारभार काटकसरीने चालू असल्याने दूध संघाची प्रगतीकडे वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन अमृतसागर सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघाचे चेअरमन आ.वैभवराव पिचड यांनी केले.
ते अमृतसागर दूध संघाच्या व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी जेष्ठ नेते गिरजाजी जाधव,कचरू पा.शेटे, प्रवीर मालुंजकर,चिमाजी वाळेकर,विठ्ठलराव डुंबरे,सीताराम भांगरे, राजेंद्र देशमुख,सुनील दातीर,सुधाकर देशमुख,राहुल देशमुख, प्रवीण धुमाळ,रवींद्र हांडे,सोपान मांडे,शरद नवले,भाऊसाहेब औटी,संघाचे व्हॉईस चेअरमन रावसाहेब वाकचौरे , संचालक गोरक्ष मालंजकर , आप्पासाहेब आवारी,आनंदराव वाकचौरे,गंगाराम नाईकवाडी, अरुण गायकर,शरद चौधरी , जगन देशमुख,रामदास आंबरे , सुभाष डोंगरे,बाबुराव बेनके,सौ .अश्विनी धुमाळ, सौ.सुलोचना औटी ,शिवाजी गायकर,दयानंद वैद्य,बाळासाहेब मुंढे तसेच कार्यकारी संचालक दादाभाऊ सावंत,सर्व दूध संस्थांचे पदाधिकारी, दूध उत्पादक शेतकरी,अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चेअरमन वैभवराव पिचड पुढे म्हणाले की, सभासदांनी केलेल्या सूचनांची दखल घेऊन योग्य ते बदल केले जातील असे सांगून सन २०२५-२६ या वर्षात संघाने केलेल्या कामाचा अहवाल विशद केला.सर्व संचालकांच्या पाठपुराव्यामुळेकिसान संपदा योजनेअंतर्गत मंजूर प्रकल्प व जिल्हा वार्षिक योजनेतून स्टोरेज टॅंक(सायलो),सचिवसंयंत्र बल्क कुलर मिळाल्याची माहिती दिली.
ब्राह्मणवाडा येथील दूध शीतकरण इमारतीचे व स्थावर मालमत्ता साठी शासनाने निर्धारित केलेली रक्कम रुपये ९७ लाख रुपयांची परतफेड संघाने केली असून अकोले येथील दूध शीतकरण इमारत व स्थावर मालमत्ता व्या साठी शासनाकडे पाठपुरावा चालू असल्याचे सांगितले.
अन्न व औषध प्रशासन आयुक्त मा.तुकाराम मुंढे यांनी केलेल्या कायद्याची कठोर अंमलबजावणी मुळे गुणवत्ता सुधारणा,भेसळ यावर नियंत्रणआल्यामुळे खाजगी व्यावसायिकांना चांगलाच लगाम बसला असून सर्व सहकारी दूध संस्थाच्या पथ्यावर पडले आहे.सभासदांनी केलेल्या सूचनेनुसार आयुक्त.मा तुकाराम मुंढे यांच्या चांगल्या कामगिरी बद्दल अभिनंदनाचा ठराव व त्यांची या विभागातून बदली होऊ नये यासाठी पत्रव्यवहार शासनाकडे पाठविण्यात येईल असे सांगितले.
सर्व प्रथम संचालक शरदराव चौधरी यांनी श्रद्धांजली चा ठराव मांडला. जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज,महर्षी अगस्ति ऋषी ,दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व लोकनेते मधुकरराव पिचड यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून श्रद्धांजली वाहण्यात आली.नंतर अहवाल सालात दिंवगत झालेल्या ज्ञात अज्ञात मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अध्यक्षिय सूचना संचालक आनंदराव वाकचौरे यांनी मांडली त्यास अनुमोदन संचालक अरुण गायकर यांनी दिले.
त्यानंतर अहवाल सालात दूध संघाला जास्तीत जास्त दूध पुरविणाऱ्या दूध उत्पादक शेतकरी व सहकारी संस्था यांचा सत्कार करण्यात आला.संचालक आप्पासाहेब आवारी यांनी प्रास्ताविक करताना दूध संघाच्या गेल्या ५० वर्षाच्या प्रगतीचा व झालेल्या स्थित्यंतरे, आलेल्या अडचणी, व त्यावर मात करून केलेल्या प्रगतीचा अहवाल सादर केला. सभासद सयाजी पोखरकर ,गणेश पापळ, सुनील वाळुंज यांनी संघाच्या पोटनियम दुरुस्ती मधील शब्दरचने आवश्यक असलेले बदलाविषयी सूचना केली तर संघाच्या प्रगती बद्दल मारुती लांडे, आहै डोंगरे आणि गोकुळ आरोटे, लक्ष्मण वैद्य,भाऊसाहेब वाकचौरे यांनी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक मंडळाचे अभिनंदन केले. विषय पत्रिकेतील सर्व विषय मंजुरीस सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. सर्व उपस्थितितांचे स्वागत कार्यकारी संचालक दादाभाऊ सावंत यांनी केले.तर आभार संचालक अरुण गायकर यांनी मानले .

