भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एक कणखर नेतृत्व!
भारतातील सर्वात सशक्त आणि प्रभावशाली नेत्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या नरेंद्र मोदींचा जन्म गुजरात मधील महसाणा जिल्ह्यातील वडनगर या गावी १७ सप्टेंबर १९५० झाला. त्यांच्या आईचे नाव हीराबेन आणि वडिलांचे नाव दामोदरदास मुलचंद असे आहे. वडील चहा विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत असत. नरेंद्र मोदींनी देखील आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवत आपल्या वडील आणि भावंडांसमवेत रेल्वे स्टेशन वर चहा विकून कुटुंबाला हातभार लावला.
नरेंद्र मोदी भारतीय राजकारणातील तो चेहरा आहे ज्यांनी अवघ्या काही वर्षांमध्ये देशातील राजकारणाची अवघी परिभाषाच बदलून टाकली. त्यांच्या राजकीय रणनीती पुढे सारा विरोधीपक्ष धारातीर्थी पडला. जगापुढे ग्लोबल लीडर म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यात देखील ते यशस्वी झाले. यामुळेच आज जनता मोदींकडे एका नायकाच्या रूपाने पहाते आहे केवळ मोदीच असे राजकीय नेता आहेत ज्यांना विदेशात देखील मोठ्या प्रमाणात सन्मान दिला जातो. वैश्विकस्तरावर नरेंद्र मोदींनी संबंध उत्तम रीतीने जोपासले आहेत आणि मैत्री देखील सांभाळलीये. त्यामुळे संपूर्ण जग त्यांच्या कुटनीतीची प्रशंसा करतांना थकत नाही. आज जरी मोदिनी आकाशाला गवसणी घातलीये तरीसुद्धा त्यांचे पाय कायम जमिनीवर स्थिरावलेले आहेत. समाजातील निम्न स्तरात राहणाऱ्या गरीब कुटुंबीयांच्या आयुष्यात आनंद आणण्याकरता ते सतत प्रयत्नशील असतात. केंद्र सरकारच्या उज्वला योजना, बेटी बचाओ-बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी योजना यांसारख्या योजनांचा उद्देश ग्रामीण भागातील महिलांच्या आणि मुलींच्या जीवनाचा स्तर उंचावणे हाच आहे. कोणताही राजकीय वारसा नसताना भाजपा ने ७ ऑक्टोबर २००१ साली नरेंद्र मोदींना गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली. मोदींनी गुजरातचा अभूतपूर्व विकास घडवून आणला आणि ते जनतेचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी होत गेले. प्रत्येक गावात वीज पोहोचविली, पर्यटनाला नवी दिशा दिली, पाण्याच्या समस्येने त्रासलेल्या प्रदेशातील लोकांची समस्या कायमची निकाली लावली. सर्व नद्यांना एकमेकींशी जोडणारे भारतातील गुजरात हे पहिले राज्य ठरले. वाईब्रेंट गुजरात शिखर संमेलनात गुजरात मध्ये अनेक रुपयांच्या रियल स्टेट मध्ये गुंतवणुक करारावर हस्ताक्षर केले. आर्थिक विकासावर आणि खाजगीकरणा वर विशेष भर दिला. या दरम्यान गुजरात राज्यातील कृषी क्षेत्रातील स्थितीत सुधारणा झाली. गुजरात महाद्विपातील सर्वात मोठ्या सोलर सिस्टम ची निर्मिती करण्यात आली. गुजरातला जगातील दुसऱ्या क्रमाकांचे सर्वश्रेष्ठ आणि आयडियल राज्य बनविले आणि सक्षम शासकाच्या रूपाने स्वतःची ओळख विकसित केली. मोदींनी आजतागायत आपल्या कार्यकाळात आपल्या कोणत्याही नातेवाईकांना आपल्या सरकारी निवासात राहण्याकरता आणलेले नाही. ते एकटेच येथे वास्तव्याला असतात. मुख्यमंत्री असतांना १३ वर्षांच्या कार्यकाळात एकदा सुद्धा सुट्टी घेतली नाही.गुजरात येथे सलग ४ वेळा मुख्यमंत्री झाल्यानंतर नरेंद्र मोदींची जादू लोकांच्यात अक्षरशः भिनलेली पाहायला मिळत होती. लोकसभा निवडणुकीत प्रधानमंत्री पदाचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितल्या जाऊ लागले. मोदींनी देशातील जनतेच्या मनातील बरेच मुद्दे घेऊन २०१३ ला संपूर्ण देशात प्रचारसभा आरंभल्या. यावेळी त्यांनी देशभरात ४३७ प्रचारसभा केल्यात. मोदींनी देशातील जनतेला अनेक आर्थिक, सामाजिक, आणि राजकीय मुद्द्यांप्रती जागरूक केले. जनतेशी संबंधित समस्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मोदींनी या झंजावाती दौऱ्यादरम्यान समस्त देशवासियांमध्ये एक नवी चेतना निर्माण केली. मोदी सोशल मिडीयावर देखील फार सक्रीय राहीले आणि या प्लेटफॉर्म च्या माध्यमातून आपले विचार ते जनमानसापर्यंत पोहोचवू शकले. लोकांना मोदीजींच्या विचारांनी आणि रणनीतिंनी इतके प्रभावित केले की जनतेने त्यांना भरपूर मतांनी विजयी केले. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप ने २८२ जागांवर ऐतिहासिक विजय मिळवला. नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान या रुपात एक नवा चेहरा बनले. आपल्या कौशल्यपूर्ण रणनीतीने विजय मिळवून दिल्यानंतर २६ मे २०१४ ला १५ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांनी देशाच्या आर्थिकस्थितीला बळकटी दिली असे नव्हे तर देशातून गरिबी, बेरोजगारी, भ्रष्टाचार दूर करण्याकरता विशेष प्रयत्न केले. महिला, मुलं, ज्येष्ठ नागरीक, व्यापारी, शेतकरी, युवा या सर्व वर्गांच्या हिताला समोर ठेऊन अनेक योजनांची सुरुवात केली. नरेंद्र मोदींनी एका मागोमाग एक विदेश दौरे करत भारताचे संबंध इतर देशांशी मजबूत करण्याचे प्रयत्न केले. विदेशी व्यवसायांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित केलं. शिक्षण, स्वास्थ्य, सुरक्षा, परिवहन, रस्ते, मनोरंजन, यांसारख्या क्षेत्रात मोदींनी अनेक कामं केलीत.या व्यतिरिक्त मेक इन इंडिया आणि डिजीटल इंडिया सारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांना जागरूक केलं. आपल्या सकारात्मक विचारांनी आणि विकसनशील कार्याने त्यांनी जनतेच्या मनात आवडता प्रधानमंत्री म्हणून आपली छाप सोडली. मोदी सरकारने पहिल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात गरीब जनतेच्या लोककल्याणासाठी, त्यांना सामाजिक, आर्थिक स्थैर्य देण्याच्या उद्देशाने विविध योजना राबविल्या. या योजनांमधून देशातील सामाजिक, आर्थिक विषमता कमी करण्यासाठी मदत झाली. त्याचबरोबर देशाच्या सुरक्षेसाठी देशाचे नेतृत्व खंबीर आहे हे मोदी सरकारने आपल्या निर्णयांतून वेळोवेळी दाखवून दिले. २०१९ च्या निवडणुकांमध्ये अभूतपूर्व यश मिळवून बनले दुसऱ्यांदा एक सक्षम आणि सशक्त प्रधानमंत्री म्हणून कमाल गेली.५४२ जागांपैकी ३०३ जागांवर विजयश्री मिळवले. रणनीतीने निवडणुकीत इतिहास रचला आणि अश्या तऱ्हेने भारताला नरेंद्र मोदींच्या रुपात प्रधानमंत्री नव्हे तर प्रधानसेवक मिळाला. देशातील राजकिय , सामाजिक, आर्थीक परिस्थिती परकीय राष्ट्रांशी असलेले संबंधाबरोबर देश भ्रष्टाचारमुक्त झाला. या देशाला भवितव्य दाखवणारा नेता गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली भाजपचे सरकार स्थापन झाले. भारतीय नागरिकांच्या बरोबरच इतर देशातील भारतीय नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या देशाचा विचार करणारा सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा ज्यांचे “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास” हा मोदी सरकारचा मंत्र, भारतीयांचे अस्मिता असणारे प्रश्न पासून समाजातील शेवटच्या घटकाचा विकास करण्यासाठी मोदी सरकारने काम सुरू केले. मोदी सरकारच्या गरीब कल्याण कार्यक्रमामुळे शोषित, वंचितांना संरक्षण मिळाले, कोरोना काळात ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य देण्यात आले, ९ कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले, ३ कोटीहून अधिक लोकांना प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना शबरी आवास योजना अंतर्गत मालकीचे घर देण्यात आले, ४१ कोटींहून अधिक लोकांचे पहिल्यांदा बँकेत जनधन खाती उघडण्यात आले. दहशतवादी शक्तींना त्याच भाषेत उत्तर देण्याचे कणखर धोरण, मोदीजीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताची प्रतिमा ‘बलशाली राष्ट्र’ अशी तयार झाली, जम्मू-काश्मीरसाठीचे ३७० वे कलम रद्द केले, दहशतवादी हल्ले कमी झाले, ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला, आर्थिक दृष्ट्या दुर्बलांना आरक्षण दिले. कोरोना काळात सर्व राज्यांना भरघोस मदत करून अवघ्या ९ महिन्यात २ स्वदेशी लस विकसीत केल्या. कोरोना काळातच पंतप्रधान गरीब कल्याण योजना राबवत गोरगरीब उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली. भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था झाली आहे. दुसर्या कार्यकाळात गेली अनेक वर्ष पडलेल्या समस्या सोडवण्यात मोदी सरकार यशस्वी झाले आहे. त्यात ‘कलम ३७०’, राम मंदिर, तिहेरी तलाक, ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’सारखे अनेक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय मागील दोन वर्षांत घेतले गेले. ‘कलम ३७०’मुळे काश्मीरचे विभाजन होऊन लडाख हा स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश नकाशावर आला. काश्मीरमधून ‘कलम ३७०’ हटवले तर रक्ताचे पाट वाहतील म्हणणार्या लोकांच्या नाकावर टिच्चून रक्ताचा थेंबही न सांडता ‘कलम ३७०’ ला श्रद्धांजली देण्यात आली. ५०० वर्षांपासून प्रलंबित असलेला रामजन्मभूमीचा मुद्दाही मार्गी लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराचा शिलान्यास केला. २०२३ ला मकरसंक्रांत च्या दिवशी जनतेच्या दर्शनासाठी प्रभू श्रीराम मंदिर खुले होणार आहे. आपल्या दमदार विदेशनितीला धरून मोदींनी धडाकेबाज विदेश दौरे करून विश्वस्तरावर भारताची एक वेगळी ओळख निर्माण केलीये. आज आपला भारत विश्वसमूहा समवेत पाऊलावर पाऊल ठेवत वाटचाल करतोय. हा परिणाम पूर्णतः मोदींच्या रणनीतीचा आणि कुटनीतीचाच म्हणावा लागेल. ज्या देशांच्या नजरेत एकेकाळी आपला भारत सलायचा, आज तेच देश भारताशी मैत्री करण्याकरता धडपडतायेत. नरेंद्र मोदींनी ब्रिक्स, सार्क, संयुक्त राष्ट्र आणि जी-२० शिखर सम्मेलनात भाग घेऊन त्याठिकाणी आपल्या भारताला मजबूत राष्ट्राच्या रुपात सर्वांसमोर ठेवलं. मोदिजींच्या विचारांचे, दूरदृष्टीचे फार कौतुक झाले. दुसरीकडे मोदींच्या जापान यात्रे नंतर भारत-जापान संबंधाना एक नवा आयाम मिळाला. नरेंद्र मोदी मंगोलिया ची यात्रा करणारे देशाचे पहीले प्रधानमंत्री आहेत.

नरेंद्र मोदींनी उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. पुलवामा हल्ल्यात अनेक भारतीय सैनिक शहीद झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी देशातील सर्व सुरक्षा बलांना कोणतीही कारवाई करण्याची मोकळीक देण्याची घोषणा केली होती. वायुसेने द्वारे एयरस्ट्राईक करण्यात आली. भ्रष्टाचाराला संपविण्यासाठी देशात नोटबंदी लागू केली. देशात लावण्यात येणाऱ्या सर्व वेगवेगळ्या टैक्स ला एकत्र करून जीएसटी लागू केला. भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाच्या रूपाने स्टेच्यु ऑफ युनिटीची निर्मिती केली. नवी दिल्ली येथे सशस्त्र बलाला सन्मानित करण्याकरता राष्ट्रीय युद्ध स्मारकाची निर्मिती करण्यात आली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याची उभारणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देहूत भाषणाला मराठीत सुरुवात केली. श्री विठ्ठलाय नमः असा जयघोष करत भाषणाला सुरुवात केली. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या असं म्हणत त्यांनी उपस्थितांची मनं जिंकली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात अनेक ठिकाणी ओव्या आणि अभंग म्हटले. ‘जे का रंजले गांजले त्यासा म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा,’ हा अभंग त्यांनी म्हटला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याआधी अनेक वेळा मराठीत संवाद साधला आहे.ते त्याच्या आईबद्दल विशेष प्रेम आणि आदर यासाठी देखील ओळखला जातात. त्यांच्या स्वच्छता अभियानाला देशभरात पसंती मिळाली. सोशल मीडियावर त्यांची सक्रियता खूप लोकप्रिय आहे.त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण देश सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे.
*लेखन :-*श्री. भाऊसाहेब वाकचौरे पाटीलसंयोजक, भाजपा, सोशल मिडिया सेल, उत्तर नगर जिल्हा