महापुरुषांना आभिवादन करून संविधान जनजागृती मोहिम व साक्षरता यात्रेची सुरुवात

– एस के. जाधव
कोकणवाडी(ता. अकोले ) प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील विश्रामगडावरील श्री छत्रपती शिवाजी महाराज, आदयक्रांतीवीर राघोजी भांगरे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीवीर राया ठाकर,शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांना विनम्र आभिवादन करून संविधान जनजागृती मोहिम व साक्षरता यात्रेला सुरुवात झाली.
या मोहिमेमध्ये पेसा कायदा जनजागृती, पर्यावरण कायदा, रस्ते सुरक्षा, व्यसनमुक्ती जनजागृती, महिला व बालसुरक्षा कायदा याविषयी गावोगावी जनजागृती करण्यात आली.
यामध्ये पाचपट्टा, तिरढे,कोकणवाडी, बिताका, एकदरे, पाडोशी, पेढेवाडी, सांगवी इत्यादी गावांचा समावेश करण्यात आला होता. आदिवासींच्या हक्कासाठी आणि आधिकारासाठी संविधानातील तरतुदी किती महत्वाच्या आहेत ही गोष्ट या दौऱ्या दरम्यान समाजापर्यंत पोहचविण्यात आल्या. तसेच पेसा कायदया संदर्भात आदिवासी ग्रामस्त, शेतकरी, विदयार्थी व युवक यांना माहिती देण्यात आली. व्यसनमुक्ती बद्दल जनजागृती करण्यात आली.
ही संवाद यात्रा ‘ क्रांतीकारी आदिवासी युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, के. ए. ग्रुप अकोले’ संदीप गवारी व अध्यक्ष अरुण गोंदके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

यावेळी के. ए. ग्रुपचे सर्व तालुका अध्यक्ष अरुण गोंदके, तुषार साबळे,वैभव गोंदके,रविंद्र साबळे,किरण कचरे, रामकृष्ण जाधव, संतोष बोराडे, समाधान भांगरे, योगेश लोखंडे,नितीन कोकाटे, बाबुराव बोराडे, महेश गवारी, धर्मा पोटकुले, कृष्णा गोड़े, अक्षय इदे, तुकाराम लोहरे, गणेश चौरे, जालिंदर भांगरे, आकाश जगताप,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



