रणद बु (ता अकोले) येथे समृद्ध किसान प्रकल्पाचे उदघाटन!

ए.एस.के. फाऊंडेशन, मुंबई आणि बायफ चा पुढाकार
एस. के. जाधव ( प्रतिनिधी )
कोकणवाडी दि. 16 – ए.एस.के. फाऊंडेशन, मुंबई पुरस्कृत आणि बायफ (BISLD), नाशिक संचलित समृद्ध किसान प्रकल्पाचे उद्घाटन रणद बुद्रुक ता अकोले येथे करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. सिद्धार्थ अय्यर (सहाय्यक उपाध्यक्ष, ए.एस.के. फाऊंडेशन) व श्री. अरुण बांबळे (व्यवस्थापक, ए.एस.के. फाऊंडेशन) . सुरेश सहाने (वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक, बायफ)यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बायफचे श्री. राम कोतवाल यांनी केले. श्री. सुरेश सहाने यांनी प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली, ज्यामध्ये फळबाग लागवड, स्ट्रॉबेरी लागवड, शाळा विकास, आरोग्य, शेततळे, जलसंवर्धन आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा यांचा समावेश आहे.
श्री. अरुण बांबळे यांनी आदर्श गाव संकल्पना मांडली आणि प्रकल्प, सरकारी विभाग तसेच ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या कामांविषयी माहिती दिली
.

श्री. सिद्धार्थ अय्यर यांनी सर्व ग्रामस्थांनी सक्रिय सहभागातून हे कार्य पुढे नेण्याचे आवाहन केले.
गावचे सरपंच श्री. सुंदरलाल भोईर यांनी ग्रामपंचायत आणि सरकारी विभागांमार्फत सुरू असलेल्या कामांविषयी माहिती दिली.
मोठादेवी ग्रामविकास समितीचे अध्यक्ष श्री.मधुकर पटेकर यांनी ग्राम विकास समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रम विषयी माहिती दिली व आभार मानले.
या कार्यक्रमासाठी बायफचे श्री. विष्णू चोखंडे, श्री. राम कोतवाल, श्री. निलेश अळवणे, श्री. मच्छिंद्र मुंढे, सौ. वर्षा भागडे, सौ. काजल देशमुख, श्री. मारुती सगभोर, तसेच श्री. तारकराम रेड्डी, श्री. मार्टिकल मैथलू, आणि मोठादेवी ग्रामविकास समितीचे अध्यक्ष, सचिव व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.
त्यानंतर समृद्ध किसान प्रकल्प अंतर्गत कामाची सुरुवात करण्यात आलेल्या रणद बुद्रुक, रणद खुर्द, गुहिरे, भंडारदरा, कोलटेंबे आणि वाकी या गावांना भेट देऊन , घोरपडा माता ग्रामविकास समिती रणद खुर्द, उत्कर्ष ग्रामविकास समिती गुहिरे, गुरुदत्त ग्रामविकास समिती कोलटेंभे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.




